(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
डिजिटल जगात ‘Mostly Sane’ म्हणून स्वतःचे नाव मिळवणारी प्राजक्ता कोळीने TIME१०० क्रिएटर्सच्या यादीत स्वतःचे नाव सामील केले आहे. यासोबतच तिने तिच्या कामगिरीच्या यादीत आणखी एक यशस्वी मार्ग पार केला आहे. या यादीत सामील होणारी प्राजक्ता ही पहिली भारतीय डिजिटल क्रिएटर ठरली आहे. हा क्षण भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. तसेच प्राजक्ताच्या चाहत्यांना या बातमीमुळे खूप आनंद झाला आहे.
आंतरराष्ट्रीय मासिक टाईमने पहिल्यांदाच जगभरातील प्रभावशाली डिजिटल कंटेंट क्रिएटर्सची ही यादी सादर केली आहे. मासिकाच्या या पहिल्या आवृत्तीत एका भारतीय क्रिएटरचे नाव समाविष्ट होणे खूप अभिमानाची गोष्ट आहे. प्राजक्ता सोबत, या यादीत जय शेट्टी, युट्यूबर मार्क्स ब्राउनली आणि टिकटॉक स्टार चार्ली डी’अमेलियो सारखी नावे देखील सामील होती. परंतु अनेक डिजिटल क्रिएटर्सना मागे टाकून प्राजक्ताने स्वतःचे स्थान मिळवले आहे.
मराठी- हिंदी भाषेच्या वादावर शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया; म्हणाली ‘मी महाराष्ट्रीय मुलगी…’
२०२५ मध्ये पहिल्यांदाच जाहीर झालेल्या या यादीत, प्राजक्ताला मनोरंजन श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. तसेच या यादीत तिच्यासोबत टेलर फ्रँकी पॉल, टेलेन बिग्स आणि हेदी वोंग यांची देखील नावे होती. या यादीत जगभरातील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपली छाप पाडणाऱ्या टॉप कंटेंट क्रिएटर्सचा समावेश होता.
प्राजक्ताने या सन्मानाला खास संबोधले
प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर TIME100 क्रिएटर्सच्या यादीत स्थान मिळाल्याची माहिती देखील चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने हा एक विशेष सन्मान असल्याचे सांगत आनंद व्यक्त केला. तिने सांगितले की, ‘या यादीत स्थान मिळणे माझ्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. ही केवळ माझ्या प्रवासाची ओळख नाही तर एका निर्मात्याची जबाबदारी आणि प्रामाणिक कथाकथनाच्या शक्तीची देखील आहे. मला नेहमीच वाटते की कंटेंट क्रिएटर्स जगात सकारात्मक बदल आणू शकतात, मग ते हवामान बदल असो, शिक्षण असो किंवा लोकांना हसवणे असो.’ असे प्राजक्ता म्हणाली आहे.
फिल्मफेअर 2025 बेस्ट सपोर्टींग अभिनेता ठरला क्षितीश दाते, ‘या’ चित्रपटासाठी मिळाले नामांकन
प्राजक्ता कोळी कोण आहे?
प्राजक्ताने २०१५ मध्ये ‘Mostly Sane’ या नावाने तिने तिचे यूट्यूब चॅनल सुरू केले. तिने तिच्या कॉमेडी व्हिडिओंनी लोकांची मने जिंकली. प्राजक्ताचे यूट्यूबवर ७० लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत आणि इंस्टाग्रामवर ८० लाख फॉलोअर्स आहेत. २०२० मध्ये तिने ‘ख्याली पुलाव’ या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिने लेटफ्लिक्स मालिका ‘मिसमॅच्ड’ आणि ‘जुग्जुग जिओ’ आणि ‘नियत’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘मिसमॅच्ड’ मालिकेत डिंपल आहुजाची भूमिका साकारून तिने प्रचंड प्रेम मिळवले आहे.