
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
The Kerala Story 2 Teaser: भारतातील हिंदू मुलींवर साधला निशाणा; यावेळी कथा अधिक गडद अन् हादरवणारी
एका वापरकर्त्याने, एक्स, “मर्दानी ३” चा रिव्ह्यू लिहिताना त्याने म्हटले, “मर्दानी ३ – एक शक्तिशाली, हृदयद्रावक गुन्हेगारी चित्रपट आहे. राणीमुखर्जी शक्तिशाली आणि निर्भय आहे, संपूर्ण चित्रपटाला घेऊन ती पुढे चालली आहे. अॅक्शन, एक रोमांचक दुसरा भाग, एक मजबूत क्लायमॅक्स. तीव्र आणि पैसा वसूल मर्दानी३ चित्रपट आहे.” दुसऱ्या नेटिझनने लिहिले, “कथा मजबूत आहे. ती गुन्हेगारी आणि न्यायाच्या थीमशी खरी राहते आणि संपूर्ण चित्रपटात एक गंभीर स्वर राखत आहे.” कथा साधी आहे पण भावनांनी भरलेली आहे आणि शेवटपर्यंत तुम्हाला गुंतवून ठेवणारी आहे.’ असे तो म्हणाला.
‘मर्दानी ३’ चे ट्विटर रिव्ह्यू
राणी मुखर्जीची खलनायक मल्लिका प्रसाद हिचेही खूप कौतुक होत आहे. काही वापरकर्त्यांनी तिच्या कौतुकात खूप लिहिले आहे. यावेळी, शिवानी राष्ट्रीय तपास संस्थेत (एनआयए) सामील होते आणि दोन मुलींच्या अपहरणाशी संबंधित एका भयानक प्रकरणाची जबाबदारी घेते. शिवानी तपासात खोलवर जाताच, हे प्रकरण आणखी भयानक वळण घेते, ज्यामध्ये मल्लिका प्रसादच्या व्यक्तिरेखेने, अम्मा नावाच्या एका वृद्ध महिलेने चालवलेले मानवी तस्करीचे नेटवर्क उघड होते. सुरुवातीला तस्करीचे जे प्रकरण दिसते ते लवकरच एका मोठ्या माफियाशी जोडले जाते.
Z कडून ‘दिलफ्लुएन्सर मूमेंट्स’ची घोषणा; ब्रँड एंगेजमेंटसाठी अभिनव मीडिया फॉर्मॅट
“मर्दानी 3” चित्रपटामधील सगळे स्टारकास्ट
“मर्दानी 3” मध्ये शैतान फेम जानकी बोडीवाला देखील मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाची पटकथा आयुष गुप्ता यांनी लिहिली आहे, जो YRF च्या “द रेल्वे मॅन” साठी ओळखला जातो आणि अभिराज मिनावाला दिग्दर्शित आहे. यशराज फिल्म्स बॅनरखाली आदित्य चोप्रा यांनी या प्रकल्पाची निर्मिती केली आहे. मल्लिका प्रसादच्या खलनायिकेच्या भूमिकेने देखील प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.