
सिनेसृष्टीतुन एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्री काजोलची आई जेष्ठ अभिनेत्री तनुजा (Tanuja Hospitalised) यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, वयोमानानुसार होणाऱ्या तक्रारीमुळे काल त्यांना अस्वस्थ वाटत होतं. काल रात्री त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करुन त्यांना आयसीयूमध्ये शिफ्ट केलं.
[read_also content=”प्रसिद्ध उद्योगपती सज्जन जिंदालवर महिलेनं केला अत्याचाराचा आरोप, लग्नाचं आश्वासन देऊन विश्वासघात केल्याचही म्हणाली! https://www.navarashtra.com/india/industrialist-sajjan-jindal-denies-allegation-of-rape-says-ready-to-cooperate-nrps-489674.html”]
वृत्तानुसार, 80 वर्षीय अभिनेत्री तनुजा यांना वयाशी संबंधित समस्यांमुळे 18 डिसेंबर रोजी जुहू येथील हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्या काजोल आणि तनिषा मुखर्जी यांची आई आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्या बऱ्या होत आहे. काळजी करण्यासारखे काही नाही.”
तनुजा ही अभिनेत्री शोभना समर्थ आणि निर्माते कुमारसेन समर्थ यांची मुलगी आहे आणि तिचे लग्न चित्रपट निर्माते शोमू मुखर्जी यांच्याशी झाले आहे, ज्यांच्यापासून तिला काजोल आणि तनिषा या दोन मुली आहेत.
ज्येष्ठ अभिनेत्री तनुजाने 1950 मध्ये आलेल्या हमारी बेटी या चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. तिने 1960 च्या छबिली चित्रपटातून सहाय्यक अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याचे दिग्दर्शन त्याची आई शोभना समर्थ यांनी केले होते, या चित्रपटात तिची बहीण नूतन मुख्य भूमिकेत होती. तनुजाने 1961 मध्ये केदार शर्माच्या दिग्दर्शनाखाली ‘हमारी याद आएगी’ मधून अभिनेत्री म्हणून तिची कारकीर्द पुढे नेली.
तनुजाच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये चांद और सूरज, बहारें फिर भी आएंगी, ज्वेल थीफ, अँटोनी फिरंगी, जीने की राह, राजकुमारी, हाथी मेरे साथी, मेरे जीवन साथीसह डझनभर चित्रपटांचा समावेश आहे. तनुजा यांना 2014 मध्ये चित्रपट उद्योगातील योगदानाबद्दल राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.