Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

२५ कोटींच्या यशाचा जल्लोष! ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’च्या यशानंतर ‘झिम्मा ३’च्या सिक्वेलची घोषणा

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आता अशातच चित्रपटाने २५ कोटींचा गल्ला पार केल्यानंतर चित्रपटाच्या संपूर्ण टीमने सेलिब्रेशन केले.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 06, 2026 | 11:07 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • चित्रपटाच्या २५ कोटी यशाचा जल्लोष
  • ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चे सेलिब्रेशन
  • ‘झिम्मा ३’ ची देखील घोषणा
 

मराठी माध्यमाच्या शाळेच्या अस्मितेला ठाम आवाज देणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५ करोडचा महत्त्वाचा टप्पा पार करत आपले यश अधिक भक्कम केले आहे. या भरीव यशानिमित्त चित्रपटाच्या टीमकडून भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला चित्रपटातील कलाकार आणि तांत्रिक टीमसह मराठी सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली.

समारंभा दरम्यान या चित्रपटाच्या प्रचंड यशावर आनंद व्यक्त करत निर्माते-दिग्दर्शकांनी टीमचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले. विशेष म्हणजे, याच सोहळ्यात प्रेक्षकांसाठी दोन मोठ्या सरप्राईज घोषणाही करण्यात आल्या. सुपरहिट ‘झिम्मा’ फ्रँचायझीचा पुढचा भाग ‘झिम्मा ३’ आणि प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या कथेला पुढे नेत असलेला ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम २’ या चित्रपटांची अधिकृत घोषणा करण्यात आली.

Rajpal Yadav: राजपाल यादव तिहार तुरुंगात; चेक बाऊन्स प्रकरणात खटला सुरू, नेमकं काय आहे प्रकरण?

‘क्रांतिज्योती विद्यालय -मराठी माध्यम’ला मिळालेल्या प्रचंड प्रेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले, “हा चित्रपट प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारला, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. २५ करोडचा टप्पा गाठणं ही संपूर्ण टीमची मेहनत आणि प्रेक्षकांच्या प्रेमाची पावती आहे. कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते आणि पडद्यामागे काम करणाऱ्या प्रत्येक सदस्याचे मनापासून आभार. तसेच रसिक प्रेक्षकांचे ऋण शब्दांत मांडता येणार नाही. याच प्रेमामुळे आम्हाला अधिक प्रामाणिक, आशयघन चित्रपट घेऊन येण्याची ऊर्जा मिळते.”

या यशस्वी प्रवासात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी यांसारख्या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. शिक्षक-विद्यार्थी नात्याची भावनिक मांडणी, वास्तवाशी जोडलेला आशय आणि मराठी शाळेच्या आठवणी जागवणारे प्रसंग यामुळे हा चित्रपट केवळ यशस्वी ठरला नाही, तर प्रेक्षकांसाठी एक भावनिक अनुभव ठरला.

अखेर एल्विशने दिली प्रेमाची कबुली; जिया शंकरसोबत गुपचूप उरकला साखरपुडा? म्हणाला ‘मला माझा जोडीदार मिळाला…’

२५ कोटींचा टप्पा, सत्कार समारंभाचा जल्लोष आणि आगामी दोन चित्रपटांच्या घोषणांमुळे ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चा प्रवास आता नव्या उंचीवर पोहोचताना दिसत आहे. प्रेक्षकांच्या प्रेमाच्या बळावर ही टीम पुन्हा एकदा दमदार आणि आशयपूर्ण कथा घेऊन येण्यासाठी सज्ज झाली आहे. दरम्यान, प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळणाऱ्या या चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमे यांचे असून, क्षिती जोग यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. सहनिर्माते म्हणून विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ यांचा सहभाग आहे.

Web Title: Krantijyoti vidyalaya marathi madhyam crosses 25 crore zimma 3 and sequel announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
1

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
2

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
3

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
4

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.