Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajpal Yadav: राजपाल यादव तिहार तुरुंगात; चेक बाऊन्स प्रकरणात खटला सुरू, नेमकं काय आहे प्रकरण?

चेक बाउन्स प्रकरणात अभिनेता राजपाल यादवने तिहार तुरुंगात स्वतःला सरेंडर केले. उच्च न्यायालयाने त्यांना ४ फेब्रुवारी पर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले होते. आता नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 06, 2026 | 10:20 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • राजपाल यादव तिहार तुरुंगात
  • चेक बाऊन्स प्रकरणात खटला सुरू
  • नेमकं काय आहे प्रकरण?
 

बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरणात तिहार तुरुंगात सरेंडर झाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अभिनेत्याला ४ फेब्रुवारी रोजी शरण येण्याचे आदेश दिले होते. परंतु, अभिनेत्याने स्वतःला सरेंडर केल्यानंतर, राजपाल यादव पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयात हजर झाले आणि दिलासा मागितला. अभिनेता म्हणाला की तो २५ लाख रुपये घेऊन आला आहे आणि उर्वरित रक्कम भरेल. परंतु, न्यायालयाने त्याला फटकारले आणि सांगितले की कोणत्याही दिलासाचा विचार करण्यापूर्वी सरेंडर करणे आवश्यक आहे.

न्यायालयाने म्हटले की सरेंडर केल्यानंतर, न्यायालय काही दिलासा देऊ शकते का ते तपासेल. उच्च न्यायालयाने असेही स्पष्ट केले की राजपाल यादवला वारंवार दिला जाणारा दिलासा हा वाद सहमतीने सोडवला जाईल आणि तक्रारदार कंपनीला त्याची भरपाई दिली जाईल या आश्वासनावर आधारित होता. परंतु, असे झाले नाही. न्यायालयाने म्हटले की ९ कोटी रुपये अजूनही बाकी आहे.

‘त्या’ भयानक रात्रीचं रहस्य उलगडणार! ‘From’ सीझन ४ ‘या’ दिवशी OTT वर येणार; नोट करा तारीख

उच्च न्यायालयाने प्रत्येक सबबी लावली फेटाळून

उच्च न्यायालयाने राजपाल यादव यांनी मांडलेल्या सर्व सबबी फेटाळून लावत स्पष्ट केले की त्यांनी वारंवार न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांना यापूर्वी देण्यात आलेला दिलासा मागे घेण्यात आला. न्यायालयाने नमूद केले की थकबाकीची रक्कम भरण्यासाठी अनेक वेळा मुदत देण्यात आली होती, मात्र ती रक्कम निश्चित कालावधीत भरली गेली नाही. डिमांड ड्राफ्ट आणि हप्त्यांद्वारे पैसे भरण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु तेही वेळेत पूर्ण झाले नाही. डिमांड ड्राफ्टमध्ये तांत्रिक आणि टायपोग्राफिकल चुका झाल्याचा युक्तिवाद करण्यात आला, मात्र न्यायालयाने तो विश्वासार्ह नसल्याचे सांगत नाकारला.

न्यायालयाने हेही स्पष्ट केले की चेक बाऊन्स प्रकरणात राजपाल यादव यांना यापूर्वीच शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र वाद सहमतीने मिटावा, यासाठी जून २०२४ पर्यंत शिक्षेला स्थगिती देण्यात आली होती. तरीही ठरलेल्या कालावधीत वाद मिटला नाही आणि भरपाई रक्कम भरण्यात अपयश आले. त्यामुळे ४ फेब्रुवारी रोजी अभिनेत्याला सरेंडर करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार राजपाल यादव गुरुवारी तिहार तुरुंगात शरण गेले. मात्र त्यांनी उच्च न्यायालयाकडे शेवटचा दिलासा मागितला, जो न्यायालयाने फेटाळून लावला.

अखेर एल्विशने दिली प्रेमाची कबुली; जिया शंकरसोबत गुपचूप उरकला साखरपुडा? म्हणाला ‘मला माझा जोडीदार मिळाला…’

४ फेब्रुवारी रोजी सरेंडर न केल्याबद्दल उच्च न्यायालयाने राजपाल यादव यांना फटकारले. ५ फेब्रुवारी रोजी ते आपल्या वकिलासह न्यायालयात हजर झाले. त्यांच्या वकिलाने सांगितले की तक्रारदार कंपनीला पैसे देण्यासाठी निधी उभारण्यात व्यस्त असल्यामुळे ते दुपारी ४ वाजता तिहार तुरुंग अधीक्षकांसमोर हजर राहू शकले नाहीत. तसेच ते सायंकाळी ५ वाजता दिल्लीत पोहोचल्यामुळे सरेंडर करता आले नाही, असा युक्तिवाद करण्यात आला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हे चेक बाऊन्स प्रकरण २०१० सालचे आहे. राजपाल यादव यांनी दिग्दर्शक म्हणून ‘अता पता लापता’ हा चित्रपट तयार केला होता. यासाठी त्यांनी मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीकडून ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. चित्रपट अपयशी ठरल्याने ते कर्ज परत फेडू शकले नाहीत. कर्ज फेडीसाठी दिलेले अनेक चेक बाऊन्स झाले. नंतर तरीही संपूर्ण रक्कम भरण्यात आली नाही. व्याजासह भरपाई वाढत गेली. अखेर २०१८ मध्ये करकडडूमा न्यायालयाने राजपाल यादव यांना दोषी ठरवत सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अपील केले होते.

Web Title: Rajpal yadav surrenders in cheque bounce case delhi hc rejects his final attempt for deadline extension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Film
  • entertainment

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.