Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्कीचा पहिल्याच दिवशी जबरदस्त परफॉर्मन्स, बॉक्स ऑफिसवरचा दुष्काळ संपवला

कल्की 2898AD प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशीच कमाईचा विक्रम केला आहे. प्रेक्षक आणि समीक्षकांच्याही चित्रपट पंसतीस उतरत आहे.

  • By नारायण परब
Updated On: Jun 28, 2024 | 04:12 PM
सौजन्य- इंस्टाग्राम

सौजन्य- इंस्टाग्राम

Follow Us
Follow Us:

सुपरस्टार प्रभासच्या बहुप्रतिक्षित  2898 एडी अखेर रिलीज झाला आहे.  संपूर्ण भारतात प्रदर्शित झाल्यामुळे या चित्रपटाच्या व्यवसायही किती करणार याविषयी उत्सुकता होती. पहिल्या दिवशी, कल्की 2898 एडीने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत 50 कोटींहून जास्त कलेक्शन  केले आहे. कल्कीमध्ये प्रभाससोबत अमिताभ बच्चन, दिपिका पादुकोण ही तगडी स्टार कास्ट आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी कल्की चित्रपट एक पर्वणी आहे.

नाग अश्विन दिग्दर्शित  ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. या सायन्स फिक्शन फ्युचरिस्टिक चित्रपटाने सुरुवातीच्या दिवशीच तगडे कलेक्शन करुन बॉक्स ऑफिसवरचा दुष्काळ संपविला आहे. कल्कीची ओपनिंग ही बॉक्स ऑफिससाठी नवी उर्जा देणारी ठरणार आहे.

कल्कीने रचला नवा विक्रम

‘कल्की 2898 एडी’ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ज्याप्रकारे यश मिळवले आहे, त्यामुळे हा चित्रपट या वर्षातील सर्वात हिट चित्रपट ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहता, ‘कल्की 2898 एडी’ पहिल्याच दिवशी 2024 मधील सर्वात मोठा पॅन इंडिया ओपनर बनून इतिहास बनू शकतो असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तथापि, ‘कल्की 2898 AD’ अजूनही एक रेकॉर्ड आहे. देशात 2024 मध्ये पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

कल्कीला रिव्ह्यू कसे मिळाले?

‘कल्की 2898 एडी’ला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. स्टारकास्टचा उत्कृष्ट अभिनय आणि चित्रपटाच्या उत्कृष्ट व्हीएफएक्सचे कौतुक होत आहे. सोशल मीडियावर प्रेक्षक ‘कल्की 2898 एडी’ला उत्कृष्ट नमुना म्हणत आहेत.

काय आहे कल्कीची कहाणी?

‘कल्की 2898एडी ‘ हा चित्रपट कलियुगातील विष्णूच्या कल्की अवतारावर आधारित आहे आणि त्याचा महाभारतातील अश्वथामाशी संबंध आहे.  कथेत भविष्यातील जग दाखविले गेले आहे.  त्यामुळे त्या जगात विज्ञान आणि तंत्रज्ञानातील आश्चर्यकारक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.  कल्कीबद्दल खूप काळापासून चर्चा आहेच आणि आज चित्रपटाच्या सुरवातीच्या कमाईने कळते की प्रेक्षकांना कल्की थिएटरपर्यंत आणण्यासाठी यशस्वी ठरला आहे.

Web Title: Kalkis stunning performance on the first day ended the drought at the box office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2024 | 10:18 PM

Topics:  

  • amitabh bacchan
  • Box Office
  • deepika

संबंधित बातम्या

Hanuman Ansh: कमी बजेटच्या ‘हनुमान अंश’चा जगभरात डंका; १२ दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियनहून अधिक कमाई
1

Hanuman Ansh: कमी बजेटच्या ‘हनुमान अंश’चा जगभरात डंका; १२ दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियनहून अधिक कमाई

Jayanti 2 Box Office Collection: ‘जयंती २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; २ कोटींची कमाई करत दुसऱ्या आठवड्यात दमदार एंट्री
2

Jayanti 2 Box Office Collection: ‘जयंती २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; २ कोटींची कमाई करत दुसऱ्या आठवड्यात दमदार एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.