फोटो सौजन्य - Raj Shamani युट्यूब
कंगना रनौतची मुलाखत : बॉलीवूड कलाकार आणि आताची खासदार कंगना रनौत तिच्या सोशल मीडियावर बऱ्याचदा सक्रिय पाहायला मिळते. तिने अनेकदा तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ती अडचणीत सापडली आहे. बऱ्याचदा ती तिचे मत सोशल मीडियाच्या माध्यमांतून देत असते. कोविडमध्ये तिने अनेक राजकीय नेत्यांवर निशाणा साधला होता, यावेळी तिला X (पूर्वीचे ट्विटर) वरून सुद्धा बॅन करण्यात आले होते. तिने आता नुकतीच एक मुलाखत दिली आहे ती मुलाखतीमध्ये तिने अनेकांवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर तिने अनेक राजकीय नेत्यांबद्दल आणि राजकीय पक्षांबद्दल खुलासे केले आहेत. तिने दिलेली ही मुलाखत काही तासांमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यावेळी तिला राजकीय नेत्यांच्या मैत्रीवर प्रश्न विचारण्यात आला यावर तिने मोठा खुलासा केला आहे.
प्रसिद्ध युट्युबर राज शमानीने कंगना रनौतची एक खास मुलाखत घेतली आहे. यावेळी त्याने तिला विचारले की, बॉलीवूडमध्ये तर तुमची मैत्री नाही मग राजकारणामध्ये तुमची मैत्री झाली आहे का कोणाशी? यावर कंगना रनौत म्हणाली की, कार्यकर्ते जेव्हा संसद भवनमध्ये असतात ते तेव्हा त्यांच्या जिल्ह्यासाठी राज्यासाठी लढत असतात ते त्यावेळी त्यांच्या राज्याचे किंवा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत असतात. त्यावेळी ते बऱ्याचदा विरोधकांवर ओरडताना दिसत असतात, भांडताना दिसतात. जेव्हा संसद भवनाच्या बाहेर येतात तेव्हा संपूर्ण चित्र बदलेल असतं. यावेळी सगळे मित्र मैत्रिणी असतात. ते सगळेजण सोबत खात असतात तर काही जण हसत असतात असे कंगनाने मुलाखतीमध्ये सांगितले.
पुढे ती म्हणाली की, मोठी लोक कॅन्टीनमध्ये नाही मजा मस्ती करत आपण सर्वानी त्यांचे फोटो पहिले आहेत. पण जेव्हा ते संसद भवनाच्या बाहेर असतात तेव्हा ते मजा मस्ती करताना दिसत असतात. मला सुद्धा किती तरी विरोधी पार्ट्यांची निमंत्रण येत असतात. माझे कितीतरी मित्र असतात जे विरोधी पक्षांमध्ये आहेत. त्यामुळे इथे जे सगळे येतात ते त्यांच्या मागणीसाठी येत असतात.