Ranya Rao Arrested : प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्रीला बंगळुरु विमानतळावरच ठोकल्या बेड्या, सावत्र वडील आहेत IPS अधिकारी, नेमकं प्रकरण काय?
दाक्षिणात्य इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री रान्या राव वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सान्या राव हिला बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे. सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अभिनेत्रीवर कारवाई करण्यात आली आहे. रान्या रावने १५ दिवसांतून चार वेळा दुबईला ये-जा केल्यामुळे ती पोलिसांच्या रडारवर आली होती.
सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपाखाली सोमवारी रात्री (०३ मार्च २०२५) महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी कन्नड अभिनेत्री रान्या रावला केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (केआयए) अटक केली. महत्त्वाचं म्हणजे हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रान्या रावचे सावत्र वडील रामचंद्र राव हे कर्नाटकातील आयपीएस अधिकारी आहेत. ते पोलिस महासंचालक (पोलिस गृहनिर्माण महामंडळ) आहेत. दुबईहून आलेल्या अभिनेत्री रान्या रावकडून तब्बल १४.८ किलो सोनं जप्त करण्यात आलं.
पीटीआयच्या वृत्तानुसार, पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) रान्याला अटक केली आहे. अटकेनंतर तिला आर्थिक गुन्हे न्यायालयात हजर करण्यात आलं, याठिकाणी अभिनेत्रीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रान्या या तस्करी प्रकरणात एकटी होती की, दुबई-भारतादरम्यान कार्यरत असलेल्या मोठ्या तस्करी टोळीचा भाग होती, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ दिवसांत अभिनेत्रीने चार वेळा दुबईला प्रवास केल्यानंतर ही अभिनेत्री त्यांच्या रडारवर आली. सोमवारी भारतात परतल्यावर तिची चौकशी करून, ही कारवाई सुरू करण्यात आली.
दरम्यान, अभिनेत्री या वर्षाच्या सुरुवातीपासूनच अनेकदा दुबई प्रवास केला होता. अभिनेत्री ही कर्नाटकातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी के. रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. त्यांच्याकडे कर्नाटक राज्याचे पोलीस गृहनिर्माण महामंडळातील पोलीस महासंचालक (डीजीपी) पद आहे. पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, रान्या राव दुबईहून एमिरेट्सच्या विमानाने बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. ती वारंवार आंतरराष्ट्रीय प्रवास करत असल्याने तिच्यावर लक्ष ठेवलं जात होतं. पोलिसांना तिच्यावर संशय आला होता, सोमवारी ती भारतात परतल्यानंतर तिच्याविरोधात कारवाई सुरू करण्यात आली.
तमन्ना भाटिया आणि विजय वर्माचा ब्रेकअप ? लग्नाच्या चर्चांदरम्यानच चाहत्यांना मोठा धक्का
सुरुवातीच्या तपासात असं दिसून आलं आहे की, रान्या रावने कस्टम्स तपासणीला बगल देण्यासाठी सावत्र वडिलांच्या नावाचा आणि त्यांच्या पदाचा उल्लेख केला होता. विमानातून उतरताना तिने कर्नाटकच्या डीजीपींची मुलगी असल्याचा दावा केला होता. शिवाय, अभिनेत्रीने स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांसोबत संपर्क साधून त्यांना घरी सोडण्यास सांगितलं. तपासकर्त्यांनी असंही सांगितले की, ती बरेच दिवस या सोन्याच्या तस्करीत सहभागी होती. तिच्या कपड्यांना आतील बाजूने सोन्याचा मुलामा होता. हे सोनं बाहेर काढलं तेव्हा त्याचं वजन सुमारे १४.८ किलो होतं.