Nassar Birthday
‘बाहुबली’ या प्रसिद्ध टॉलिवूड चित्रपटात बिज्जलदेवचे व्हिलन भूमिका साकारणाऱ्या अभिनेता नास्सर यांचा आज वाढदिवस आहे. ५ मार्च १९५८ रोजी जन्मलेले ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते नास्सर आज ६७ वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहेत. नास्सर यांनी आपलं सर्व आयुष्य अभिनयालाच समर्पित केलं आहे. नास्सर यांनी आपल्या फिल्मी करियरमध्ये सर्वच चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. विविध प्रकारच्या भूमिका साकारत आपल्या अभिनयाच्या छाप प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे. कधी त्यांनी दुष्ट राजाची भूमिका साकारली तर कधी सर्वसाधारण शेजाऱ्याची. नास्सर यांनी भूमिका साकारताना त्यात समरसून काम केलं. अशा या हरहुन्नरी कलाकाराच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी जाणून घेऊ या.
रश्मिका मंदानाच्या समर्थनार्थ कंगना रणौत आली पुढे, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना दिले चोख उत्तर!
नास्सर हे एक प्रसिद्ध अभिनेता असून ते एक टॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक देखील आहेत. मद्रासमधील चेंगलपट्टू येथे जन्मलेल्या नास्सर यांचे संपूर्ण नाव एम. नास्सर आहे. त्यांनी १९८५ पासून एका तमिळ चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या फिल्मी करियरला सुरुवात केली. त्यांचा पहिला चित्रपट ‘कल्याण अगाथीगल’ नावाचा होता. नास्सर यांना खरंतर बालपणापासूनच अभिनयाची खूप आवड होती. त्यामुळे त्यांनी करियरमध्ये चित्रपटात काम करण्याची सुरुवात केली. त्यांना चित्रपटांची इतकी आवड होती की छोटीशी भूमिका मिळाली तरीही ते आनंदी राहायचे. त्यांच्या आनंदाला पारावार नसायचा. नास्सरने चित्रपटांमधून आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली. पण, त्याच्यासाठी मार्ग अजूनही सोपा नव्हता. चित्रपटांमध्ये छोटीशी भूमिका मिळाली तर मी ती करायचो. भविष्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला.
तमन्ना भाटिया आणि विजय वर्माचा ब्रेकअप ? लग्नाच्या चर्चांदरम्यानच चाहत्यांना मोठा धक्का
अभिनय क्षेत्रात येण्याआधी नास्सर यांनी एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले आहे. त्यांच्या खांद्यावरच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. त्यामुळे ते कायमच वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या करत होते. घरासंसाराची घडी बसवल्यानंतर नास्सर यांनी अभिनयाच्या विश्वात स्वतःचं नशीब आजमावलं. त्यांना नशीबानं साथ दिली आणि ते आज एक प्रसिद्ध अभिनेते म्हणून ओळखले जात आहेत. नास्सर यांनी अभिनेता व्हावं हे त्यांच्या वडिलांचं स्वप्न होतं. त्यांच्या वडिलांचं नाव मेहबूब बशा असं आहे. जेव्हा नास्सर यांनीही त्यांना अभिनेता होण्याची इच्छा आपल्या वडिलांना सांगितली तेव्हा त्यांनी केवळ पाठिंबा दिला असं नाही तर त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत देखील केली. नास्सर यांची मेहनत आणि वडिलांची तीव्र इच्छाशक्ती यामुळे ते अभिनेता म्हणून यशस्वी ठरले. नास्सर यांनी के बलाहचंदर यांच्या ‘कल्याण अगाथिगल’ मध्ये नास्सर यांनी सहाय्यक अभिनेता म्हणून काम करायला सुरुवात केली.
लग्नासाठी केलं धर्मांतर, आता ७ वर्षांनी दीपिका आणि शोएब इब्राहिम घेणार घटस्फोट? अभिनेता म्हणाला…
अभिनयात पदार्पण केल्यानंतर एसपी मुथुरमन यांच्या ‘वेलाकरण’ आणि ‘वन्ना कानवुगल’ मध्ये नकारात्मक भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी कधीच मागं वळून पाहिलं नाही. नास्सर यांच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग देखील आले. त्यात त्यांना त्यांच्या नाकामुळे आणि रुंद कपाळामुळे त्यांच्यावर खूप टीका झाली होती. परंतु त्या टीकेकडे नास्सर यांनी फार लक्ष दिलं नाही. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी यश मिळवलं आणि टीकाकारांची तोंड बंद केली.