
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘कांतारा- चैप्टर 1’ ची ओटीटी रिलीज डेट समोर आली आहे. चित्रपट अजूनही चित्रपटगृहात जोरदार कमाई करत आहे आणि थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर 30 दिवसांनंतरच हा चित्रपट ओटीटीवरही दाखल होण्यासाठी तयार आहे. निर्मात्यांनी स्वतः अधिकृत घोषणेद्वारे ‘कांतारा- चैप्टर 1’ ची ओटीटी रिलीज डेट जाहीर केली आहे. ऋषभ शेट्टीचा हा ब्लॉकबस्टर चित्रपट ऑक्टोबर महिन्यातच डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे.
ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा- चैप्टर 1’ ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल. प्रेक्षक हा चित्रपट 31 ऑक्टोबर 2025 पासून डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहू शकतील. प्राइम व्हिडिओने सोशल मीडियावर ‘कांतारा- चैप्टर 1’चा शानदार टीझर शेअर केला. प्राइम व्हिडिओवर कांतारा- चैप्टर 1, 31 ऑक्टोबरपासून, कन्नड, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत पाहता येणार आहे.
२०२२ मध्ये प्रदर्शित झालेला “कांतारा” ब्लॉकबस्टर ठरला. आता, त्याचा प्रीक्वल, “कांतारा: अ लेजेंड: चॅप्टर १”, रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर तुफान गाजवत आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाला प्रचंड प्रेम दिले आहे. “थामा” आणि “एक दीवाने की दिवानियत” सारख्या नवीन रिलीजच्या पार्श्वभूमीवरही, “कांतारा: अ लेजेंड: चॅप्टर १” ची क्रेझ जबरदस्त पाहायला मिळाली आहे.
get ready to witness the LEGENDary adventure of BERME 🔥#KantaraALegendChapter1OnPrime, October 31@hombalefilms @KantaraFilm @shetty_rishab @VKiragandur @ChaluveG @rukminitweets @gulshandevaiah #ArvindKashyap @AJANEESHB @HombaleGroup pic.twitter.com/ZnYz3uBIQ2 — prime video IN (@PrimeVideoIN) October 27, 2025
रिलीजच्या पहिल्या तीन आठवड्यात जोरदार कलेक्शन केल्यानंतर, चित्रपटाने चौथ्या आठवड्यातही मोठा नफा कमावला आहे.25 दिवसांत ऋषभ शेट्टीच्या या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 589.60 कोटी रुपयांचा कलेक्शन केला आहे. तर, जागतिक पातळीवर 813 कोटी रुपये कमावत ‘कांतारा- चैप्टर 1’ ने 2025 वर्षाची सर्वात मोठी भारतीय फिल्म म्हणूनही नाव कमावले आहे.