कन्नड चित्रपट कांतारा सध्या रिलिज होऊन महिना उलटला आहे तरीही कांतारा चित्रपट अद्याप बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दाक्षिणात्य भाषेनंतर चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनही रिलीज झाला. त्यालाही प्रेक्षकांनी चांगलच डोक्यावर घेतलं. मोठ्या पडदा गाजवल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
[read_also content=”सोनी बीबीसी अर्थच्या नोव्हेंबरमधील लाइन-अपसह पहा रहस्यांचा उलगडा https://www.navarashtra.com/movies/unravel-the-mysteries-with-sony-bbc-earths-november-line-up-nrvb-345808.html”]
अख्या चित्रपटसृष्टीला वेड लावणाऱ्या दाक्षिणात्य चित्रपटाचा ”कांतारा” नं चित्रपटाने तर सर्व रेकॉर्ड मोडले आहे. या चित्रपटानं जगभरात 200 कोटींहुन जास्त कमाई केली आहे. कन्नड चित्रपटानं पडद्यावर आपली जादु दाखवल्यानंतर हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत रिलिज करण्यात आला. या चित्रपटानं प्रेक्षकांवर चांगलीच भुरळ घातली. प्रेक्षकांसह समीक्षकांच्या पंसतीस उतरलेला हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघता येणार आहे. या चित्रपटानं अनेक विक्रम तोडले. हा चित्रपट कन्नड सिनेसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. कमाईच्या बाबतीत या सिनेमाने केजीएफ सिनेमालादेखील मागे टाकलं आहे. हा सिनेमा 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. आतापर्यंत या सिनेमाने 330 कोटींची कमाई करत अनेक रेकॉर्ड्स केले आहेत.
[read_also content=”सिंहगडावरील अतिक्रमण निष्कासीत; वन अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस फौजफाटा तैनात https://www.navarashtra.com/maharashtra/encroachment-on-sinhagad-expelled-a-large-force-of-police-along-with-forest-officials-has-been-deployed-nrgm-345828.html”]
रिलिज होण्याआधीपासुन ते आतापर्यंत कातांरा चित्रपट सतत कोणत्या कोणत्या कारणामुळे येत होता. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या ‘भूल कोला’ या परंपरेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. ‘भूल कोला’ या परंपरेबाबत आणि चित्रपटातील सीनबद्दल वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला. यामुळे कनार्टक मध्ये या अभिनेता चेतन कुमार अहिंसावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, चित्रपटातील ‘वराह रुपम’ या गाण्याला वरुनही वाद झाला. या गाण्याला प्रेक्षकांची फार पंसती मिळाली. या गाण्यामध्ये श्रीविष्णू यांच्या वराह अवताराची स्तुती करण्यात आली आहे. मात्र या गाण्यावर न्यायालयाने बंदी आणली आहे. केरळमधील म्युझिकल बँड थक्कुडम ब्रिजने कांतारावर ‘नवरसम’ गाण्यावर चोरीचा आरोप केला आहे. यासाठी जबाबदार क्रिएटिव्ह टीमवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बँड पथकाने केली. हा वाद न्यायालयात गेल्यानंतर अखेर या गाण्याबाबत निकाल देण्यात आला असून गाण्यावर बंदी घालण्यात आली आहे.