प्रसिद्ध टेलिव्हिजन सेलिब्रिटी कपलने लग्नाच्या ३ वर्षांनंतर दिली गुड न्यूज; अभिनेत्री म्हणाली, “बाळासाठी प्लॅनिंग करत नव्हतो, पण...”
‘दिल ही तो है’फेम प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री गुरप्रीत बेदी लवकरच आई होणार आहे. गुरप्रीत आणि तिचा पती अभिनेता कपिल आर्य आता लवकरच आई- बाबा होणार असून ते त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. गुरप्रीत आणि कपिलने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केली आहे. या कपलने बेबी बंप फ्लॉंट करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
अनन्या पांडेला ‘लायगर’ मध्ये का काम करायचं नव्हतं ? वडील चंकी पांडेंनी केला खुलासा
दोन दिवसांपूर्वीच गुरप्रीत आणि कपिलने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. गोड बातमी दिल्यानंतर गुरप्रीतने नुकतेच दिलेल्या मुलाखतीत तिने आई-बाबा होण्याबद्दलच्या भावना शेअर केल्या आहेत. ई- टाईम्ससोबत संवाद साधताना गुरुप्रीत म्हणाली की, “२०२१ मध्ये आम्ही ऐन कोरोना काळात लग्न केले. तेव्हाही आम्ही लग्नाचे योग्य प्लॅनिंग करू शकलो नव्हतो.. पण तरीही आमचा लग्नासोहळा खूप छान झाला होता आणि सर्वांनी लग्नात खूप छान वेळ घालवला होता. त्याचप्रमाणे, आम्ही आताही बेबी प्लॅनिंग करत नव्हतो, पण ही एक योजना होती. देवाला ही माहित होतं की, माझ्यासाठी आणि कपिलसाठी हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे आम्ही दोघंही बाळाचे स्वागत करण्यास तयार आहोत.” असं गुरप्रीत म्हणाली.
गुरप्रीत शेवटची २०२४ मध्ये टेलिकास्ट झालेल्या ‘श्रीमद रामायण’मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिने तिच्या कामाबद्दल सांगितले की, “माझ्याकडे गेल्या वर्षी (२०२४) अनेक चांगल्या ऑफर आल्या होत्या, पण माझ्या प्रेग्नेंसीमुळे मी त्या नाकारल्या होत्या. कामाला नकार देणं थोडं अवघड होतं, पण मला ते करावं लागलं. मी माझ्या बाळाच्या आगमनाची वाट पाहत आहे आणि जेव्हा मी पूर्णपणे बरी झालेली असेल, फिट असेल, कामासाठी पूर्णपणे तयार असेल तेव्हाच परत येईन.”
‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार ? ’, सोनी मराठी शोधत आहे तुमच्यातला किर्तनकार
गुरप्रीत बाळाला जन्म मार्च २०२५ मध्ये देणार आहे, प्रेग्नेंसीबद्दलही तिने भाष्य केले, ती म्हणाली की, “मी प्रग्नेंट असल्याचं आम्हाला ज्या दिवशी कळालं, तेव्हा आम्ही दोघेही एका कामासाठी बाहेर गेलो होतो. मला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यामुळे माझ्या मनात सर्वच विचित्र प्रकारचे विचार येत होते. पण जेव्हा आम्ही डॉक्टरांकडे गेलो तेव्हा आम्हाला चांगली बातमी मिळाली आणि तेव्हापासून आम्ही सर्वजण खूपच आनंदित आणि उत्साहित आहोत. आहोत. काही दिवस कठीण असतात पण तेही चांगले आहेत. कपिल माझी खूप काळजी घेतोय आणि मला सांभाळून घेतोय,” असं गुरप्रीतने सांगितलं.