फोटो सौजन्य: सोशल मीडिया
२०२२ मध्ये रिलीज झालेल्या ‘लायगर’ चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Actress Ananya Panday) आणि टॉलिवूड अभिनेता विजय देवरकोंडा (Actor Vijay Deverakonda) प्रमुख भूमिकेत होते. ९० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६१ कोटींची कमाई केली होती. बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेल्या चित्रपटाबद्दल अनन्या पांडेच्या वडिलांनी अडीच वर्षांनंतर महत्वाचं विधान केलं आहे. नुकतंच मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत चंकी पांडेंनी ‘लायगर’ चित्रपटा दरम्यानचा किस्सा शेअर केला आहे.
चंकी पांडेंनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “अनन्याला पहिल्यांदाच चित्रपटाची ऑफर आल्यानंतर मी या चित्रपटासाठी तयार नसल्याचे सांगितले. ती विजय देवरकोंडासोबत काम करण्यासाठी Uncomfortable वाटत होतं. जेव्हा तिने मला विचारलं की तिने हा चित्रपट करावा का, तेव्हा तिला वाटत होतं की ती त्या चित्रपटासाठी खूप लहान आहे. त्यावेळी ती मला म्हणाली, बाबा मी हे सगळं करण्यासाठी खूप लहान आहे. तेव्हा मी अनन्याला हा चित्रपट करण्याचा सल्ला दिला होता. कारण तो एक मोठा चित्रपट होता. पण कदाचित तिचं म्हणणं बरोबर होतं. ती त्या चित्रपटात काम करण्यासाठी खूपच लहान होती. त्यामुळे ती स्वत:ला Uncomfortable वाटून घेत होती. ती म्हणाली की, कदाचित मी यासाठी खूप लहान आहे. तेव्हा ती गोंधळलेल्या अवस्थेत होती. ”
‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार ? ’, सोनी मराठी शोधत आहे तुमच्यातला किर्तनकार
चंकी पांडे पुढे म्हणाले की, “मी अनन्यावर ‘लायगर’ चित्रपटानंतर कोणत्याही चित्रपटामध्ये करण्यासाठी दबाव आणला नाही. कदाचित मी चुकलो असेन. मी जुन्या शाळेतील विद्यार्थी आहे. मला जास्त सध्याच्या मुलांच्या विचाराबद्दल माहिती नाही. जर तिने मला विचारले असते, बाबा, मी हे करावे का? तर मी नकार दिला असता.” अनन्या पांडेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने ‘स्टुडंट ऑफ द इयर- २’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं आहे. त्यानंतर तिने ‘लायगर’, ‘काली पिली’, ‘पती पत्नी और वो’, ‘ड्रीम गर्ल २’ या चित्रपटातून काम करत आपला चाहतावर्ग निर्माण केला.