Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी विनोद केला, नंतर माफी मागितली; ॲटलीची खिल्ली उडवल्यानंतर कपिल शर्माची पहिली प्रतिक्रिया

कपिल शर्माने ॲटलीला त्याच्या दिसण्यावरून टोमणा मारला होता. दिग्दर्शकाने अभिनेत्याच्या टोमण्याला प्रत्युत्तरही दिलं होते. कपिल शर्माची आणि ॲटलीची ती व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कपिलला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 18, 2024 | 04:33 PM
आधी विनोद केला, नंतर माफी मागितली; ॲटलीची खिल्ली उडवल्यानंतर कपिल शर्माची पहिली प्रतिक्रिया

आधी विनोद केला, नंतर माफी मागितली; ॲटलीची खिल्ली उडवल्यानंतर कपिल शर्माची पहिली प्रतिक्रिया

Follow Us
Close
Follow Us:

‘बेबी जॉन’च्या प्रमोशननिमित्त ॲटली कुमारने चित्रपटाच्या टीमसोबत ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’शोमध्ये हजेरी लावली होती. या दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, कपिल शर्माने दिग्दर्शक ॲटली कुमारला त्याच्या दिसण्यावरून काहीसा टोमणा मारला होता. दिग्दर्शकाने अभिनेत्याच्या टोमण्याला मोजक्या शब्दात प्रत्युत्तरही दिले होते. पण सध्या ही व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असून त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. ट्रोलर्सला प्रत्युत्तर देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

कपिल शर्माने ॲटली कुमारची लूकवरून उडवली खिल्ली, सुप्रसिद्ध दिग्दर्शकाने अभिनेत्याला मोजक्या शब्दातच सुनावले…

‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’मध्ये ‘बेबी जॉन’च्या टीमने हजेरी लावली होती. या एपिसोडमध्ये कपिलने ॲटलीच्या दिसण्यावरून विनोद केला. त्याच्या विनोदावर ॲटलीने टाळ्या वाजवून प्रत्युत्तर दिलं. तसेच दिसणं महत्त्वाचं नाही, असं ॲटलीने कपिलला टोमणाही मारला. कपिल शर्मा दिग्दर्शक ॲटली कुमारला म्हणतो, “जेव्हा तू एखाद्या कलाकाराला पहिल्यांदा भेटायला जातो, तेव्हा ते ॲटली कुठे आहे? असा प्रश्न विचारतात का?”

कपिल शर्माच्या ह्या प्रश्नावर ॲटली कुमार म्हणतो, “मला तुमचा प्रश्न कळाला आहे. पण, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. मी सर्वात आधी दिग्दर्शक आणि निर्माते ए.आर. मुरुगदास सरांचा मी खरोखर आभारी आहे, कारण त्यांनी माझ्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली. त्यांनी स्क्रिप्ट मागितली, पण मी कसा दिसतोय किंवा मी ते करण्यास सक्षम आहे की नाही हे त्यांनी पाहिलं नाही. त्यांना कथा आवडली. त्यामुळे जगानेही लोकांकडे तसंच पाहावं. तुम्ही कसे दिसता, यावरून तुमच्याबद्दल मतं तयार होऊ नये. मला वाटतं जगाने माणूस कसा दिसतो यावरुन त्याला जज करु नये. त्याचं मन कसं आहे, यावरुन त्याला जज करावं.” असं ॲटली म्हणाला.

 

Dear sir, can you pls explain me where n when I talked about looks in this video ? pls don’t spread hate on social media 🙏 thank you. (guys watch n decide by yourself, don’t follow any body’s tweet like a sheep). https://t.co/PdsxTo8xjg

— Kapil Sharma (@KapilSharmaK9) December 17, 2024

दरम्यान याप्रकरणी कपिलनं एक्स पोस्ट शेअर करत तो म्हणाला की, “प्रिय सर, या व्हिडिओमध्ये मी तुमच्या लूकबद्दल केव्हा आणि कुठे बोललो आहे, हे तुम्ही मला समजावून सांगू शकता का? कृपया करून सोशल मीडियावर द्वेष पसरवू नका धन्यवाद. मित्रांनो, तुम्हीच पाहा आणि ठरवा, मेंढरांप्रमाणे कोणाच्याही ट्विटला फॉलो करू नका.” कपिलच्या या पोस्टवर आता अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काही यूजर्स याप्रकरणी कपिलचं समर्थन करताना दिसत आहेत. तर काही त्याच्यावर टीका करताना दिसत आहेत.

सिंपल छाया कदम आता डॅशिंग अंदाजात दिसणार, ‘स ला ते स ला ना ते’ मधला अभिनेत्रीचा लूक पाहिलात का ?

दरम्यान कपिलच्या शोमध्ये ‘बेबी जॉन’ची संपूर्ण टीम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती. या शोमध्ये वरुण धवनबरोबर अभिनेत्री कीर्ती सुरेश, वामिका गब्बी, निर्माता अ‍ॅटली आणि दिग्दर्शक कलीस हे आले होते. दरम्यान ‘जवान’ चित्रपटातून अ‍ॅटलीनं हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. आता ‘बेबी जॉन’मधून पुन्हा एकदा ॲटली धमाका करणार आहे. हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर 25 डिसेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. याशिवाय या चित्रपटामध्ये सलमान खान कॅमियो करणार आहे.

Web Title: Kapil sharma breaks silence after facing backlash over insulting atlee on the great indian kapil show

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 04:33 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Kapil Sharma
  • The Great Indian Kapil Sharma Show

संबंधित बातम्या

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद
1

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार
2

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार

The Bengal Files: ‘काश्मीरची परिस्थिती बंगालपेक्षा चांगली…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, पल्लवी जोशी संतापल्या!
3

The Bengal Files: ‘काश्मीरची परिस्थिती बंगालपेक्षा चांगली…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, पल्लवी जोशी संतापल्या!

‘बागी ४’ च्या सेटवर मोठी दुर्घटना; १२ फूटच्या उंचीवरून खाली पडले दोन कलाकार, रुग्णालयात दाखल
4

‘बागी ४’ च्या सेटवर मोठी दुर्घटना; १२ फूटच्या उंचीवरून खाली पडले दोन कलाकार, रुग्णालयात दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.