कपिल शर्माने ॲटली कुमारची लूकवरून उडवली खिल्ली, सुप्रसिद्ध दिग्दर्शकाने अभिनेत्याला मोजक्या शब्दातच सुनावले...
गेल्या वर्षी ‘जवान’ आणि सध्या ‘बेबी जॉन’ चित्रपटामुळे सुप्रसिद्ध दिग्दर्शक ॲटली कुमार प्रकाशझोतात आला होता. “मुर्ती लहान पण किर्ती महान…” ही म्हण या दिग्दर्शकाला अगदी योग्य आहे. ‘बेबी जॉन’ चित्रपटामुळे चर्चेत आलेला दिग्दर्शक सध्या त्याच्या लूकमुळे चर्चेत आहे. प्रमोशननिमित्त ॲटली कुमार ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटीवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’ मध्ये गेला होता. या शोमध्ये कपिल शर्माने दिग्दर्शकाला त्याच्या दिसण्यावरून काहीसा टोमणा मारला. दिग्दर्शकाने अभिनेत्याच्या टोमण्याला मोजक्या शब्दातच प्रत्युत्तरही दिले आहे.
पंकज उधास ते उस्ताद झाकीर हुसैन…; २०२४ या वर्षी जगाचा निरोप घेणारे सिने जगतातील सितारे
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या नुकत्याच टेलिकास्ट झालेल्या एपिसोडमध्ये ‘बेबी जॉन’च्या टीमने हजेरी लावली होती. यावेळी, वरुण धवन, कीर्ती सुरेश, वामिका गब्बी आणि दिग्दर्शक ॲटली कुमार यांनी हजेरी लावली होती. या एपिसोडमध्ये कपिलने ॲटलीच्या दिसण्यावरून विनोद केला. त्याच्या विनोदावर ॲटलीने टाळ्या वाजवून प्रत्युत्तर दिलं. तसेच दिसणं महत्त्वाचं नाही, असं ॲटलीने कपिलला टोमणाही मारला आहे. कपिल शर्मा दिग्दर्शक ॲटली कुमारला म्हणतो, “जेव्हा तू एखाद्या कलाकाराला पहिल्यांदा भेटायला जातो, तेव्हा ते ॲटली कुठे आहे? असा प्रश्न विचारतात का?”
तेजश्री प्रधानला होणारा जीवनसाथी कसा हवा ? सांगितल्या अपेक्षा…
Kapil Sharma subtly insults Atlee’s looks?
Atlee responds like a boss: Don’t judge by appearance, judge by the heart.#Atlee #KapilSharma pic.twitter.com/oSzU0pRDS4
— Surajit (@surajit_ghosh2) December 15, 2024
कपिल शर्माच्या ह्या प्रश्नावर ॲटली कुमार म्हणतो, “मला तुमचा प्रश्न कळाला आहे. पण, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. मी सर्वात आधी दिग्दर्शक आणि निर्माते ए.आर. मुरुगदास सरांचा मी खरोखर आभारी आहे, कारण त्यांनी माझ्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली. त्यांनी स्क्रिप्ट मागितली, पण मी कसा दिसतोय किंवा मी ते करण्यास सक्षम आहे की नाही हे त्यांनी पाहिलं नाही. त्यांना कथा आवडली. त्यामुळे जगानेही लोकांकडे तसंच पाहावं. तुम्ही कसे दिसता, यावरून तुमच्याबद्दल मतं तयार होऊ नये. मला वाटतं जगाने माणूस कसा दिसतो यावरुन त्याला जज करु नये. त्याचं मन कसं आहे, यावरुन त्याला जज करावं.” असं ॲटली म्हणाला. या एपिसोडमधील क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आता कपिलला लोक त्याच्या या वर्णद्वेषी विनोदासाठी ट्रोल करत आहेत.
Will they never stop these crass and racist jibes at his skin color in the name of ‘comedy’?
Someone with the amount of influence and clout like Kapil Sharma saying something like this is disappointing and unfortunately, not surprising. https://t.co/63WjcoqHzA
— Chinmayi Sripaada (@Chinmayi) December 15, 2024
कपिलच्या ह्या कृत्यामुळे त्याला इंडस्ट्रीतूनही ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. गायिका चिन्मयी श्रीपदाने ॲटलीवर कमेंट करणाऱ्या कपिलला खडेबोल सुनावले आहेत. एक्सवर पोस्ट शेअर करत ती म्हणते, “कपिल शर्मा ‘कॉमेडी’च्या नावाखाली लोकांच्या त्वचेच्या रंगावर कुत्सित आणि वर्णद्वेषी टोमणे केव्हाच थांबवणार नाही का? कपिल शर्मासारख्या प्रभावशाली आणि इतक्या चांगल्या व्यक्तीने असं काहीतरी बोलणे चुकीचे आहे.” दरम्यान याच एपिसोडमध्ये कपिल शर्माने अर्चना पुरण सिंह यांचीही चेष्टा केली. ॲटलीने मग अर्चना यांची बाजू घेण्याचा प्रयत्न करत तिला शोचं ‘तारणहार’ म्हटलंय. त्या हसतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर छान स्माईल दिसते. कपिल शर्माने रंग रुपावरुन ॲटलीची चेष्टा करणं नेटकऱ्यांना अजिबात आवडलेलं नाही. ॲटलीवर केलेल्या कमेंटवरुन कपिलला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
अॅटली कुमार आता फक्त दिग्दर्शक नाही, तर निर्माताही झाला आहे. दरम्यान अॅटली वरुण धवनच्या आगामी चित्रपटाचा ‘बेबी जॉन’ सहनिर्माताही आहे. ‘बेबी जॉन’हा त्याच्या सुपरहिट ‘थेरी’चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ‘थेरी’मध्ये थलपती विजयची मुख्य भूमिका होती. आता या हिंदी रिमेक ‘बेबी जॉन’या ॲक्शन ड्रामामध्ये वरुण धवनसह कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २५ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.