कॅनडातील कॅप्स कॅफेवर गोळीबार झाल्यानंतर कपिल शर्मासाठी आणखी एक वाईट बातमी, काय घडलं?
कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडातल्या कॅप्स कॅफेवर काल फायरिंग करण्यात आली. एका अज्ञात व्यक्तीने अभिनेत्याच्या कॅफेवर गोळीबार केला. अभिनेत्याच्या कॅफेवर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्यामुळे अभिनेता चिंतेत असताना, आता अशातच अभिनेत्यासंबंधित आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कपिल शर्मा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता शोच्या तिसऱ्या सीझनमुळे चर्चेत आहे. गोळीबाराचा फटका अभिनेत्याच्या शोवरही पडला आहे. नेमका अभिनेत्याला काय फटका बसला आहे ? जाणून घेऊया…
गेल्या काही दिवसांपासून ‘नेटफ्लिक्स’वर ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’चा तिसरा सीझन टेलिकास्ट होत आहे. २१ जून २०२५ रोजी रिलीज झालेल्या या शोमध्ये सलमान खानने एन्ट्री घेतली होती. सलमान खानच्या ग्रँड एन्ट्रीने शोची सुरुवात झाली होती. भाईजानच्या ह्या पहिल्याच एपिसोडला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं होतं. परंतु त्यानंतर मात्र ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’च्या व्ह्यूवरशीपवर मोठी तफावत पाहायला मिळाली. नेटफ्लिक्सवर ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’च्या व्ह्यूवरशीपवर मोठा परिणाम पाहायला मिळाला. हा शो जगभरातील नॉन-इंग्रजी शोध्ये सातव्या स्थानावर खाली गेला आहे.
व्ह्यूजबद्दल बोलायचे तर, पहिल्या एपिसोडला व्ह्यूजच्या आधारावर 1.6 मिलियन व्ह्यूज मिळाले होते. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या एपिसोडच्या व्ह्यूजवर मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. या एपिसोडला अनुक्रमे १.६ मिलियन व्ह्यूज आणि १.९ मिलियन व्ह्यूज, असे मिळाले आहेत. हे आकडे आलिया भट्ट असलेल्या सीझन २ च्या पहिल्या एपिसोडपेक्षा जास्त आहेत. कपिलच्या शोच्या दुसऱ्या सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये आलिया भट्ट दिसली होती आणि त्या एपिसोडला १.२ मिलियन प्रेक्षक आणि १.४ मिलियन व्ह्यूज मिळाले होते.
मराठी तारकांनी रंगला Filmfare, मोठमोठ्या कलाकारांची रेड कार्पेट लागली हजेरी !
पण सीझन १ च्या व्यूवरशिपला अद्याप कोणीही मागे टाकू शकले नाही. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या पहिल्या सीझनमध्ये रणबीर कपूर आणि नीतू कपूर पाहुणे म्हणून आले होते. या एपिसोडला २.४ दशलक्ष व्ह्यूअर्स मिळाले होते. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. तिसऱ्या सीझनबद्दल बोलायचे झाले तर, ‘मेट्रो इन दिनों’च्या कलाकारांचा दुसरा एपिसोड काढून टाकल्यानंतर ही संख्या कमी झाली आहे. या शोला फक्त २० लाख व्ह्यूज मिळाले आहेत आणि एकूण ४.५ मिलियन व्यूअरशिप मिळाले आहेत.