(फोटो सौजन्य - x अकाउंट)
गुरुवारी विनोदी कलाकार कपिल शर्माबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. बुधवारी रात्री त्याच्या कॅनडास्थित ‘कॅप्स कॅफे’ रेस्टॉरंटवर गोळीबार करण्यात आला आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे रेस्टॉरंट सुरू होऊन एक आठवडाही झाला नव्हता आणि दहशतवाद्यांनी विनोदी कलाकाराचे स्वप्न चकनाचूर करून टाकला आहे. खलिस्तानी दहशतवाद्यांनी या संपूर्ण हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. आता एका दिवसानंतर, कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेने या गोळीबारावर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. जाणून घेऊयात ते नक्की काय म्हणाले आहेत.
हल्ल्यानंतर कॅप्स कॅफेने पहिली प्रतिक्रिया दिली
कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेने इस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये त्याने लिहिले आहे, ‘हृदयातून आलेला संदेश, आम्ही चविष्ट कॉफी आणि मैत्रीपूर्ण संभाषणांमुळे उबदारपणा, समुदाय आणि आनंदासाठी कॅप्स कॅफे उघडले. स्वप्नांसोबत केलेला हिंसाचार हृदयद्रावक आहे. आम्ही या धक्क्यातून सावरत आहोत पण हार मानणार नाही. तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. डीएमद्वारे शेअर केलेले तुमचे दयाळू शब्द, प्रार्थना आणि आठवणी तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त आहेत.’ असे लिहून ही पोस्ट कॅप्स कॅफेने शेअर केली आहे.
लवकरच भेटूया एका चांगल्या आकाशाखाली
पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, ‘आम्ही एकत्रितपणे या उभ्या केलेल्या कामावर तुमचा विश्वास असल्याने कॅप्स कॅफे अस्तित्वात आहे. चला या हिंसाचाराच्या विरोधात उभे राहूया आणि कॅप्स कॅफेला ठिकाण काळात खंबीर बनवण्याचा प्रयत्न करूया. कॅप्स कॅफेमध्ये तुमच्या सर्वांचे आभार. लवकरच एका चांगल्या आकाशाखाली आपण पुन्हा भेटू.’ कॅप्स कॅफेने दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘या कठीण काळात सर्वांची सुरक्षितता राखण्यासाठी त्यांनी दिलेल्या जलद प्रतिसादाबद्दल आणि प्रयत्नांबद्दल आम्ही पोलिस आणि @dettapd यांचे मनापासून आभार मानतो.’
कॅप्स कॅफेवर गोळ्या का झाडण्यात आल्या?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हल्ल्याची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लाडीने गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. असे म्हटले जात आहे की तो कॉमेडियन कपिल शर्माने त्याच्या कॉमेडी शो दरम्यान केलेल्या एका टिप्पणीवर खूश नव्हता. त्यामुळे त्याने ही घटना घडवून आणली. हरजीत सिंग लाडी हा दहशतवाद विरोधी एजन्सी एनआयएचा दहशतवादी आहे.