काय सांगता! बेबो ४४ व्या वर्षी तिसऱ्यांदा आई होणार? करीनाचे मोनोकिनी लूकमधील फोटो चर्चेत
बॉलिवूडची बेबो म्हणून करीना कपूर खानची अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये ओळख आहे. करीना कायमच तिच्या दमदार अभिनयामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. सध्या बेबो वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. करीनाने २०१२ साली, तब्बल १० वर्षे वयाने मोठ्या असणाऱ्या सैफसोबत लग्नगाठ बांधली होती. या कपलला दोन मुलं आहेत. काही तासांपूर्वीच करीनाने इन्स्टाग्रामवर फॅमिलीसोबतचे व्हॅकेशन एन्जॉय करणारे फोटोज् शेअर केले आहेत. ते फोटो पाहून चाहत्यांमध्ये सध्या भलतीच चर्चा पाहायला मिळत आहे.
‘Baaghi 4’ चं शूटिंग संपताच टायगर श्रॉफने शेअर केला स्पेशल फोटो, अभिनेत्याचा फिटनेस फ्रिक लूक चर्चेत
सध्या करीना सुट्टीचा आनंद लुटत आहे. काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर मोनोकिनी लूकमधील काही फोटोज् शेअर केले आहेत. सध्या ते प्रचंड चर्चेत आले आहेत. अभिनेत्रीचे मोनोकिनी लूकमधील फोटोज् पाहून चाहत्यांमध्ये अभिनेत्री आता तिसऱ्यांदा आई होणार आहे, अशी चर्चा होत आहे. करीना सध्या ४४ वर्षांची आहे, वयाच्या ४४ व्या वर्षी बेबो तिसऱ्यांदा आई होणार अशी चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होताना दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये करीनाने स्कीन आणि ब्लॅक कलरच्या मोनोकिनी लूकमध्ये तिचं थोडं पोट दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांना करीना तिसऱ्यांदा आई होणार असल्याची शंका आली आहे.
कंगना रणौतला राजकारणात नाही येतेय मज्जा…; म्हणाली, “समाजसेवा करणे ही माझी…”
अनेक चाहत्यांनी करीनाच्या हॉटनेसचं कौतुक केलं असून काही चाहत्यांनी ती तिसऱ्यांदा आई होणार आहे, अशी कमेंट केली आहे. “करीना तू प्रेग्नेंट आहेस का?” अशी कमेंट एका चाहतीने केली आहे. तर आणखी एक चाहता म्हणते, “तिसरं बाळ येतंय”, तर एका चाहत्याने प्रेग्नेंट बाईची इमोजी कमेंट केली आहे. आणखी एका चाहतीने क्यूट बेबी बंप म्हणत कमेंट केली आहे. सध्या करीनाच्या ह्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. करीनाला दोन मुलं आहे, मोठ्याचं नाव तैमुर असून छोट्याचं नाव जेह आहे. करीनाचा मोनोकिनी लूकमधला फोटो पाहून चाहत्यांमध्ये सैफ अली खानच्या घरी तिसऱ्यांदा पाळणा हलणार अशी चर्चा सुरु आहे.
दरम्यान, करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, बेबो शेवटची रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ चित्रपटामधून चाहत्यांच्या भेटीला आली होती. त्यात तिने अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारली होती.