ना अभिषेक, ना संजय, 'या' अभिनेत्यासाठी करिश्मा कपूरचं मन झालं होतं खुळं; तुम्हाला नाव माहितीये का?
कपूर घराण्यातील अतिशय सुंदर अभिनेत्री म्हणून करिश्मा कपूर प्रसिद्ध आहे. अवघ्या इंडस्ट्रीमध्ये फक्त करिश्मा या नावामुळेच नाही तर, ‘लोलो’ या नावानेही प्रसिद्ध झालेल्या करिश्माला प्रसिद्धी मिळाली आहे. करिश्माने फक्त अभिनयाच्या जोरावरच नाही तर, सौंदर्याच्या जीवावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. पण करिश्मा कपूर अनेकदा फिल्मी करियरसोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. आज करिष्मा कपूर तिचा ५१ वा वाढदिवस आहे. अभिनेत्रीचा जन्म २५ जून १९७४ रोजी मुंबईमध्ये झाला आहे.
करिश्मा गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. नुकतंच करिश्माचा एक्स पती संजय कपूर यांचे आकस्मिक निधन झाले. करिश्मा आणि संजय यांनी तब्बल १३ वर्षे एकत्र संसार केला आणि त्यानंतर एकमेकांकडून घटस्फोट घेत आपआपला जीवनाचा मार्ग निवडला. करिश्मा आणि संजय यांनी एकमेकांकडून २०१६ साली घटस्फोट घेतला. घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूरने तिसरं लग्न केलं. परंतु करिश्माने ‘सिंगल मदर’ म्हणून राहण्याचा निर्णय घेतला. करिश्माने ९० च्या दशकामध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने पदार्पण केल्यानंतर गोविंदा आणि सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करत चाहत्यांना अनेक हिट चित्रपट दिले.
करिश्माने २००३ साली साली घरातल्यांच्या सांगण्यावरून अभिनेत्रीने बिझनेसमन संजय कपूर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. परंतु त्याआधी करिश्मा कपूरचं लग्न बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनसोबत ठरत होतं, पण काही कारणास्तव त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. असं असलं तरीही करिश्मा कपूरच्या मनात वेगळाच व्यक्ती होता. ना अभिषेक, ना संजय… याचा खुलासा स्वत: करिश्माची बहिण करीना कपूर खान हिने एकदा ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’ या शोमध्ये तिने केला होता. त्यावेळी शोमध्ये करिश्मा आणि करीना दोघीही बहिणी एकत्र आल्या होत्या. त्या दरम्यान, कपिलने करीनाला करिश्माबद्दल प्रश्न विचारला की, तुझ्या बहिणीचा (करिश्मा) क्रश कोण आहे ?
Panchayat 4 वेबसीरीज झाली लिक, फ्री डाऊनलोड करण्यासाठी युजर्सने शेअर केल्या लिंक्स
या प्रश्नाचं उत्तर देताना करिश्माच्या कानावर हेडफोन लावण्यात आला होता. त्यावेळी करीनाने भर शोमध्ये सलमान खानचं नाव घेतलं होतं. ज्याच्यासाठी करिश्माचं मन वेडेपिसे होते. करिश्माने अभिषेक नव्हे तर संजय कपूरसोबत लग्न केले असले तरी बॉलिवूड अभिनेता सलमान खानसाठी तिच्या मनात विशेष स्थान होतं. करिश्मा कपूर आणि सलमान खान यांनी बीवी नंबर १, जुडवा, अंदाज अपना अपना, हम साथ साथ हैं, दुल्हन हम ले जाएंगे आणि चल मेरे भाई की सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. हे सर्व चित्रपट त्या काळात बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते. संजयसोबत लग्न झाल्यानंतर करिश्माने सलमान खानसोबत एकाही चित्रपटात काम केले नाही.
प्रसिद्ध अभिनेत्री सना खानवर कोसळला दुःखाचा डोंगर, अभिनेत्रीच्या आईचे निधन; व्यक्त केले दुःख
खरंतर, करिश्माने लग्नानंतर बॉलिवूडमध्ये फार काही चित्रपटांमध्ये काम केले नाही. करिश्माने २००३ मध्ये लग्न केले. पुढे ३ वर्षांनंतर करिश्माने ‘मेरे जीवन साथी’ चित्रपटातून पुन्हा बॉलिवूडमध्ये जोरदार कमबॅक केलं. त्यानंतर पुन्हा एकदा करिश्माने २०१२ साली रिलीज झालेल्या ‘डेंजरस इश्क’ चित्रपटाच्या माध्यमातून १२ वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये जोरदार कमबॅक केलं. त्यानंतर २०२४ साली रिलीज झालेल्या ‘मर्डर मुबारक’ चित्रपटाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सध्या करिश्माकडे कोणतेही चित्रपट नाही. तरीही ती कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.