subodh bhave and tejashri pradhan starrer new serial on zee marathi promo releasing soon
‘होणार सून मी ह्या घरची’, ‘अग्गंबाई सासूबाई’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेच्या माध्यमांतून अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रसिद्धीझोतात आली आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनामध्ये घर करुन राहणारी तेजश्री प्रधान सध्या नव्या मालिकेमुळे चर्चेत आली आहे. तिच्या नव्या मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अद्याप मालिकेचं नाव गुलदस्त्यात असून मालिकेच्या प्रोमोने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे दोघंही या नव्या मालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे.
Panchayat 4 वेबसीरीज झाली लिक, फ्री डाऊनलोड करण्यासाठी युजर्सने शेअर केल्या लिंक्स
झी मराठीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मालिकेचा पहिला वहिला प्रोमो शेअर केला आहे. नव्या मालिकेच्या ह्या झलकमध्ये तेजश्री आणि सुबोध दोघांचाही चेहरा दिसत नाही. दोघांच्याही फक्त आवाजावरुन सोशल मीडियावर चाहते अंदाज लावताना दिसत आहे. तेजश्री आणि सुबोध हे दोघेही या नव्या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. व्हिडिओमध्ये अभिनेता म्हणतोय की, “घरची जबाबदारी पेलताना वय निघून गेलं आणि हळुहळू लग्नाची वेळ आली. लोकांचं ठाऊक नाही पण, माझ्यासाठी लग्न म्हणजे वचन आणि जबाबदारी निभावणं. एकमेकांचं होता- होता आपल्या कुटुंबाला सांभाळणं. मी आहे तसा माझा स्वीकार करणारी व्यक्ती… आता मिळणं थोडं अवघड वाटतंय… पण, कोणाला सांगू की कधी-कधी मलाही एकटेपणा सतावतोय.”
Ultra Jhakas OTT वर घरबसल्या पाहायला मिळणार साऊथ थ्रिलरचा धमाका…
त्यानंतर पुढे मालिकेच्या प्रोमोमध्ये अभिनेत्री म्हणते की, “मला अनेकजण म्हणतात, अगं… वय झालं आतातरी लग्न उरकून घे. पण ह्यांना कोण सांगणार? मला नाही वाटत का माझं लग्न व्हावं? मलाही वाटतं की आपले म्हणणारं हक्काचं माणूस आयुष्यात असावं. पैसा, प्रतिष्ठा यापेक्षा त्याने आमचं नातं जपावं. पण, अशी मुलं आहेत का या दुनियेत? तो वरचा माझी लग्नगाठ बांधायला विसरलाय बहुतेक…” प्रोमोमध्ये दोघांचाही रिव्हिल करण्यात आलेला नाही. मात्र, बॅकग्राऊंडला या दोन्ही पात्रांचा आवाज ऐकताच क्षणी नेटकऱ्यांनी या दोन्ही कलाकारांना अचूक ओळखलं आहे. “नात्यांची वीण नव्याने जुळणार, प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार” असं कॅप्शन देत निर्मात्यांनी मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री सना खानवर कोसळला दुःखाचा डोंगर, अभिनेत्रीच्या आईचे निधन; व्यक्त केले दुःख
तेजश्री आणि सुबोध हे दोघंही एका मॅच्युअर लव्हस्टोरीतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काही तासांतच हा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. टीआरपीच्या दृष्टीकोनातून ही मालिका ब्लॉकबस्टर ठरेल, असा अंदाज चाहते बांधत आहेत. अशा अनेक कमेंट्स चाहत्यांन इन्स्टाग्रामवर केल्या आहेत.