Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

करीना-सैफच्या रिलेशनशिपबद्दल समजल्यावर करिश्मा कपूरची प्रतिक्रिया कशी होती ?

९० च्या दशकातल्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये करीना कपूर आणि करिश्मा कपूरचा कायमच समावेश केला जातो. गेल्या तीन दशकांपासून करीना आणि करिष्मा इंडस्ट्रीत सक्रिय आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो' मध्ये करीना कपूरने सैफसोबतच्या नात्याबद्दल पहिल्यांदा कधी खुलासा केला याबद्दल करिश्मा कपूरने सांगितले.

  • By चेतन बोडके
Updated On: Oct 13, 2024 | 08:01 PM
करीना-सैफच्या रिलेशनशिपबद्दल समजल्यावर करिश्मा कपूरची प्रतिक्रिया कशी होती ?

करीना-सैफच्या रिलेशनशिपबद्दल समजल्यावर करिश्मा कपूरची प्रतिक्रिया कशी होती ?

Follow Us
Close
Follow Us:

९० च्या दशकातल्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये करीना कपूर आणि करिश्मा कपूरचा कायमच समावेश केला जातो. कपूर कुटुंबीयांमधील या दोघीही पहिल्याच अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीमध्ये आल्या आहेत. गेल्या तीन दशकांपासून करीना आणि करिष्मा इंडस्ट्रीत सक्रिय आहे. नुकत्याच ह्या दोघीही बहिणींनी नेटफ्लिक्सवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’ मध्ये हजेरी लावली होती. शोमध्ये, जेव्हा करीना-सैफच्या रिलेशनशिपबद्दल समजलं, तेव्हा तुझी (करिश्मा) पहिली प्रतिक्रिया कशी होती ? असा प्रश्न कपिलने करिश्माला विचारला होता.

हे देखील वाचा – ‘फुलवंती’ची महाराष्ट्रात तुफान क्रेझ, प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून प्राजक्ता माळी भारावली!

तिने दिलेलं उत्तर ऐकून सर्वच आश्चर्यचकित झाले होते. करीना कपूरने सैफसोबतच्या नात्याबद्दल पहिल्यांदा कधी खुलासा केला याबद्दल बोलताना करिश्मा कपूरने सांगितले की, “आम्ही दोघी तेव्हा लंडनमध्ये होतो. करिनाने तिला काय सांगायचं आहे हे सांगण्यापूर्वी ती मला म्हणाली की, तू आधी एका ठिकाणी बसून घे. पण ती मला असं बसायला का सांगतेय ? हे मला काही कळत नव्हतं. आम्ही दोघीही तेव्हा लंडनमध्ये एका दुकानात शॉपिंग करत होतो. तर मी त्या दुकानातल्या एका सोफ्यावर बसून घेतले. त्यानंतर तिने मला जे काही सांगितले, ते ऐकून मी लोटपोट हसत होते.”

हे देखील वाचा – झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मोलमजुरी; ‘पंचायत’ फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ

मुलाखतीत पुढे करिश्माने सांगितले की, “मला करीना म्हणाली की, “मी सेफवर प्रेम करते, असं मला तुला सांगायचं आहे. आम्ही दोघंही एकमेकांना डेट करतोय.” करीनाने मला सांगितलेली गोष्ट ऐकून त्या बेडला घट्टबसून राहावं की काय असं वाटत होतं.” मुलाखती दरम्यान करिश्माने सांगितलं की, मला करीनाने सांगितलेली गोष्ट समजायला काही वेळ लागला. “सैफ तर माझा मित्र आणि सहकलाकार होता नाही का?” असं करिश्माने करीनाला विचारले.

त्यानंतर कपिलने करीनाला विचारले की, पहिलं प्रेम कोणी व्यक्त केलं, सैफने की करीनाने ? तर करीना म्हणाली, “जे मला ओळखतात, त्यांना माहित असेल की, मीच त्याला प्रपोज केलं असेल. पण आमच्यामध्ये, त्याला थेट माझ्या भावना सांगाव्या, हे माझ्यासाठी फार महत्वाचे होते.” शोमध्ये करीनाने तिच्या स्वभावाविषयीही सांगितले. ती म्हणाली की, “सगळ्यांना माहितीये की, मी स्वतःची आवडती आहे. त्यामुळे कोणी सांगण्याआधी मला त्यालाच सांगणं गरजेचं होतं…”

हे देखील वाचा – “नसिरुद्दिन शाह यांनी मला बघितलं आणि…”, किरण मानेंनी सांगितला नाटकादरम्यान ‘तो’ किस्सा

करिश्मा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ‘नेटफ्लिक्स’वर रिलीज झालेल्या ‘मर्डर मुबारक’ चित्रपटामध्ये करिश्मा कपूर शेवटची दिसली होती. त्यानंतर सध्या करिश्मा ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या रिॲलिटी शोचं जजिंग करत आहे. तर करीना कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, ‘द बकिंगहॅम मर्डर्स’मध्ये ती शेवटची दिसली होती. तिचे या चित्रपटातल्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. करीना कपूर लवकरच रोहित शेट्टीच्या ‘सिंघम रिटर्न्स’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट दिवाळीमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटात करिनाव्यतिरिक्त अजय देवगण, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर दिसणार आहेत.

Web Title: Karisma kapoor reveals she was shocked to know about kareena kapoor saif ali khan affair actress first proposed saif with 2 children sara ibrahim ali khan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 08:01 PM

Topics:  

  • Kareena Kapoor
  • Saif Ali Khan

संबंधित बातम्या

Zero फिगर राखणाऱ्या Kareena Kapoor चा काय आहे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर? न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने दिला डाएट प्लॅन
1

Zero फिगर राखणाऱ्या Kareena Kapoor चा काय आहे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर? न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने दिला डाएट प्लॅन

काय सांगता! बेबो ४४ व्या वर्षी तिसऱ्यांदा आई होणार? करीनाचे मोनोकिनी लूकमधील फोटो चर्चेत
2

काय सांगता! बेबो ४४ व्या वर्षी तिसऱ्यांदा आई होणार? करीनाचे मोनोकिनी लूकमधील फोटो चर्चेत

करीना कपूरच्या मनात अजूनही ‘ती’ भिती कायम; म्हणाली, “मुलांनी ती घटना इतक्या लहान वयात…”
3

करीना कपूरच्या मनात अजूनही ‘ती’ भिती कायम; म्हणाली, “मुलांनी ती घटना इतक्या लहान वयात…”

सोनम कपूरच्या पार्टीत नेमकं झालं तरी काय? बेबोचा उदास चेहरा पाहून चाहते अस्वस्थ, Video Viral
4

सोनम कपूरच्या पार्टीत नेमकं झालं तरी काय? बेबोचा उदास चेहरा पाहून चाहते अस्वस्थ, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.