सध्या सगळीकडे कान्स फिल्म फेस्टीवलची (Cannes 2024 ) चर्चा सुरू आहे. नुकतचं अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने कान्स फिल्म फेस्टीवलमध्ये हजेरी लावत सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं. तिच्या लूकची चर्चा सुरू असतानाच आता तिच्या पाठोपाठ आता बॅालिवूडच्या आणखी एका सुंदर अभिनेत्रीनं सगळ्या जगांच लक्ष वेधून घेतलयं. ती अभिनेत्री आहे कियारा अडवाणी. कियारा अडवाणी (Kiara Advani) 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्टाईलमध्ये पदार्पण केलयं. रेड कार्पेटवर तिचा लूक पाहून चाहते तिचं कौतुक करताना दिसत आहेत. चाहते तिच्या सौंदर्याची आणि फॅशन स्टाइलची प्रशंसा करत आहेत.
[read_also content=”कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दुसऱ्य दिवशीही ऐश्वर्या रायचाच जलवा, पुन्हा तिच्या ड्रेसनं वेधलं सर्वांचं लक्ष https://www.navarashtra.com/movies/aishwarya-rai-bachchan-look-for-cannes-film-festival-2024-goes-vira-nrps-534509.html”]
अभिनेत्री कियारा अडवाणीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे. तिने खास कान्स फिल्म फेस्टीव्हलसाठी लूक केला होता. यासाठी कियाराने पांढऱ्या रंगाचा स्लिट गाऊन निवडला होता, ज्याचा डिप नेक होता. यासोबत तिने मोतीच्या कलरचे मॅचिंग कानातले घातले आणि हिल्स घालत तिचा लूक पूर्ण केला. व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की कियारा अडवाणी स्टायलिश स्टाईलमध्ये कारमधून उतरते आणि कॅमेऱ्यासमोर किलर पोज देण्यास सुरुवात करते. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून सगळेजण कियाराच्या फॅशन सेन्सचं कौतुक करताना दिसत आहे.