बॉलीवूडचा सिंघम आता नव्या अवतारात मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. अजय देवगण आणि आर माधवन स्टारर सुपरनॅचरल हॉरर फिल्म ‘शैतान’चे काउंटडाउन सुरू झाले आहे. ‘शैतान’ चित्रपटाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. हा चित्रपट ८ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विकास बहलच्या आगामी ‘शैतान’ चित्रपटाची आगाऊ बुकिंग काही दिवसांपूर्वी भारतात सुरू झाली. या चित्रपटाची दमदार ओपनिंग होणार असा दावा केला जात आहे.
शैतान या चित्रपटाने चार दिवसांत ॲडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी कमाई केल्याचे सांगितले जात आहे. या दमदार स्टार चित्रपटाने रिलीजच्या एक दिवस आधी, शैतानची आतापर्यंत किती तिकिटे विकली गेली आहेत, चित्रपटाचे किती शो झाले आहेत आणि आगाऊ बुकिंगमधून सुपरनॅचरल थ्रिलरने आतापर्यंत किती कमाई केली आहे, याबद्दल जाणून घेऊया. ‘काल’ आणि ‘भूत’ सारख्या चित्रपटांनंतर अजय देवगण पुन्हा एकदा 2024 साली हॉरर जॉनरसह चित्रपटाच्या पडद्यावर परतणार आहे. मात्र, त्यांचा हा चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा पूर्णपणे वेगळा असणार आहे. शैतानची चर्चा प्रेक्षकांमध्ये फारशी नसली तरी या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या शोची तिकिटे जोरात विकली जात आहेत.
शैतानची आतापर्यंत एकूण ८९ हजारांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. हे फक्त ऑनलाइन तिकीट बुकिंग आहे. Sakanlik.com च्या अहवालानुसार, शैतानने ॲडव्हान्स बुकिंग कलेक्शनमधून आतापर्यंत एकूण २.०७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे, जो रिलीजपूर्वी खूप चांगला आकडा आहे.