'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्री आशा शर्मा यांचे प्रदीर्घ आजाराने निधन
हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर येत आहे. ‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्री आशा शर्मा यांचं निधन झालं आहे. गेल्या वर्षभरापासून एका दुर्धर आजारामुळे आजारी होत्या. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. आज सकाळी त्यांचे निधन झाले आहे. आशा शर्मा यांच्या निधनाचे वृत्त सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनच्या सोशल मीडिया हँडलवरून देण्यात आली आहे. आशा यांच्या निधनानंतर टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमक्या कोणत्या आजारामुळे आशा शर्मा यांचे निधन झाले आहे, याबद्दलची माहिती मिळालेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, आशा शर्मा गेल्या वर्षभरापासून कुठल्यातरी आजारामुळे त्रस्त होत्या. पण त्या आजारासोबत त्यांची झुंज अपयशी ठरली. CINTAA ने शेअर केलेल्या पोस्टवर फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी, दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, आशा शर्मा यांच्या निधनावर त्यांच्या परिवारातील कोणत्याही व्यक्तीने किंवा त्यांच्या कोणत्याही जवळच्या व्यक्तीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
#cintaa expresses its condolences on the demise of Asha Sharma #condolence #restinpeace @poonamdhillon @dparasherdp @itsupasanasingh @HemantPandeyJi_ @ImPuneetIssar @rishimukesh @bolbedibol @iyashpalsharma @SahilaChaddha @actormanojjoshi @RealVinduSingh @HetalPa45080733 @ljsdc pic.twitter.com/RihVuk7I5g
— CINTAA_Official (@CintaaOfficial) August 25, 2024
अनेक हिंदी मालिकेंमध्ये आणि चित्रपटांमध्ये आशा शर्मा यांनी आई आणि आजीची भूमिका साकारली होती. आशा ह्या खास करून चाहत्यांमध्ये आई आणि आजीच्या भूमिकेंमुळेच ओळखल्या जायच्या.. आशा यांना खरी ओळख १९८२ मध्ये रिलीज झालेल्या धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या ‘दोन दिशाये’ चित्रपटाने मिळवून दिली होती. आशा यांनी त्या चित्रपटात निवारण शर्मा नावाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात प्रेम चोप्रा, अर्जुन इराणीस निरुपमा रॉय हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. याशिवाय आशा शर्मा ह्या ‘मुझे कुछ केहना है’, ‘प्यार तो होना ही था’ आणि ‘हम तुम्हारे है सनम’ या चित्रपटातही महत्त्वाच्या भूमिकेत होत्या. आशा ह्या शेवटच्या प्रभास आणि क्रिती सेननच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत होत्या. त्यांनी ४० वर्षांच्या फिल्मी करिरमध्ये, ४० चित्रपटांत आणि अनेक टेलिव्हिजन सीरीयलमध्ये काम केले आहे.