सौजन्य- कंगना रणौत इन्स्टाग्राम
भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे छोटे सुपुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट दोघेही १२ जुलै रोजी लग्नबंधनात अडकले. यांच्या लग्नासाठी राजकीय, क्रिडा, फिल्म इंडस्ट्रीसह वेगवेगळ्या इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज मंडळींनी उपस्थिती लावली होती. या नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी भारतासह जगभरातील अनेक दिग्गज मान्यवर मुंबईत उपस्थित होते. पण यांच्या लग्नासाठी बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौतने उपस्थिती लावली नव्हती. महत्वाची गोष्ट म्हणजे, कंगनाला अनंत अंबानी यांनी खास फोन करून लग्नाचे आमंत्रण दिले होते. पण तरीही तिने लग्नाला उपस्थिती लावली नव्हती. नुकतंच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने लग्नाला न जाण्याचे कारण सांगितले आहे.
सध्या कंगना रणौत तिच्या ‘इमरजन्सी’ नावाच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. प्रमोशन दरम्यान सिद्धार्थ कन्ननला अभिनेत्रीने मुलाखत दिली होती. यावेळी तिला “तू अनंत अंबानीच्या लग्नाला का उपस्थिती लावली नव्हती ?” असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर तिने उत्तर दिले की, “मला अनंत अंबानीने स्वत: फोन करून मला लग्नाचं आमंत्रण दिले होते. अनंत खरंतर स्वभावाने खूप गोड मुलगा आहे. “तू माझ्या लग्नाला यायलाच हवं” असं देखील तो मला म्हणाला होता. त्याच दिवशी आमच्याही घरी लग्न आहे, असं मी त्याला सांगितलं होतं. १२ जुलै हा दिवस खूपच शुभ होता आणि त्याच दिवशी माझ्या छोट्या भावाचं लग्न असल्यामुळे मी येऊ शकले नाही. तसंही मी नेहमीच अशा फिल्मी लग्नांना जाणं टाळते.”
कंगनाने अंबानीच्या लग्नाच्या कोणत्याही फंक्शनला उपस्थिती लावली नव्हती. जामनगरला आणि इटलीला झालेल्या प्री- वेडिंगला त्याचसोबत लग्नाच्या आधीच्या झालेल्या कोणत्याही इव्हेंटलाही तिने उपस्थिती लावली नव्हती. या इव्हेंटसाठी अमिताभ बच्चन, जया बच्चन, सलमान खान, शाहरूख खान, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, प्रियंका चोप्रासह अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. त्याशिवाय अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींनी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक महत्वाच्या व्यक्तींनीही लग्नाला उपस्थिती लावली होती.
कंगना रणौत दिग्दर्शित आणि निर्मित ‘इमरजन्सी’ चित्रपट येत्या ६ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत होता. अनेक मोठ्या काळानंतर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटामध्ये स्वर्गीय माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका कंगना रणौतने साकारली आहे. शिवाय, अनुपम खेर, सतिश कौशिक, मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी आणि विषक नायर हे कलाकारही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.