Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“सैफच्या मणक्यात चाकूचं टोक…”, अभिनेत्याच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली सविस्तर माहिती

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर लीलावती हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांनी माध्यमांशी संवाद साधला. लीलावती रुग्णालयाचे डॉ. नितीन डांगे यांनी माध्यमांना दिली.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 16, 2025 | 02:35 PM
“सैफच्या मणक्यात चाकूचं टोक...”, अभिनेत्याच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली सविस्तर माहिती

“सैफच्या मणक्यात चाकूचं टोक...”, अभिनेत्याच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली सविस्तर माहिती

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर आज मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीने प्राणघातक हल्ला केला होता. मध्यरात्रीच अभिनेत्याला हल्ल्यानंतर त्याचा मोठा मुलगा इब्राहिम अली खानने लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले होते. सुरुवातीला अभिनेत्याला खोल जखमा झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानुसार, त्याच्यावर आज सकाळी शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेनंतर अभिनेत्याची प्रकृती आता स्थिर असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती लीलावती रुग्णालयाचे डॉ. नितीन डांगे यांनी माध्यमांना दिली. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांनी माध्यमांशी संवाद साधला.

Ibrahim Khan: इब्राहिमने सैफला कारने नाही तर ऑटोने नेले रुग्णालयात; वडिलांना जखमी पाहून मुलगा झाला भावुक!

लीलावती रुग्णालयाचे डॉ. नितीन डांगे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, “आज सकाळी सैफवर न्युरोसर्जरी आणि प्लास्टिकसर्जरी करण्यात आलेली आहे. शस्त्रक्रियेनंतर आता अभिनेत्याला आयसीयू वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. आयसीयूमध्ये अभिनेत्याला किमान एक दिवसासाठी त्याच्यावर निरीक्षण केलं जाईल, सध्या अभिनेत्याची प्रकृती स्थिर असून तो लवकरात लवकर बरा होईल. शिवाय, अभिनेत्याला दोन खोल जखमाही झालेल्या आहेत. तर काही किरकोळ जखमाही अभिनेत्याला झालेल्या आहेत. ”

 

VIDEO | Doctor Nitin Dange, Neurosurgeon at Lilavati Hospital, provides an update on actor Saif Ali Khan’s condition. Saif Ali Khan was admitted to the hospital after being attacked by an intruder early this morning at his Bandra home: Here’s what he said: “Mr Saif Ali Khan was… pic.twitter.com/2mWNTBVzAb — Press Trust of India (@PTI_News) January 16, 2025

डॉ. नितिन डांगे यांनी पुढे माहिती दिली की, “मध्यरात्री २ च्या सुमारास सैफ अली खान हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यावर हल्ला झाल्यामुळे ते गंभीर जखमी होते. त्यांच्या मणक्यामध्ये चाकूचा छोटा तुकडा अडकल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली होती. शस्त्रक्रियेच्या माध्यमातून अभिनेत्याच्या मणक्यातून चाकूचा तुकडा काढण्यात आला आहे. लिकिंग स्पायनल फ्लुएडवरही उपचार करण्यात आले आहे. डाव्या बाजूला आणि मानेवरील असलेल्या खोल जखमांवर प्लास्टिक सर्जरी टीमकडून उपचार करण्यात आले आहेत. अभिनेत्याची आता प्रकृती पूर्णत: स्थिर असून प्रकृतीत सुधारणा आहेत.”

Breaking News: सैफ अली खानच्या हल्लेखोराची ओळख पटली, पोलिसांनी सांगितले, ‘आरोपी चोरीच्या उद्देशाने आला पण…’

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मज्जातंतूतज्ज्ञ डॉ. नितीन डांगे, सुघटनशल्य चिकित्सक डॉ. लीना जैन, भूलतज्ज्ञ डॉ. निशा गांधी आणि डॉ. नीरज उत्तमनी यांच्या निरिक्षणाखाली उपचार करण्यात आले आहे. शिवाय ह्या डॉक्टरांच्याच निरिक्षणाखाली अभिनेत्याच्या प्रकृतीकडे लक्ष दिलं जात आहे.

Web Title: Leaking spinal fluid injured thoracic spinal cord doctors reveal how saif ali khan was brought to the hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2025 | 02:19 PM

Topics:  

  • Saif Ali Khan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.