(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Saif Ali Khan Attack News In Marathi: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासानंतर आरोपीची ओळख पटली आहे. सैफ अली खान सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहे. सैफ अली खानल आयसीयू वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. गुरुवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास सैफ अली खानवर त्याच्या घरात चाकूने हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना त्यांच्या घरातील मुलांच्या खोलीत घडली.
सैफ अली खान त्याच्या कुटुंबासह मुंबईतील वांद्रे येथे राहतो. त्याचे अपार्टमेंट इमारतीच्या ७ व्या मजल्यावर आहे. अशा परिस्थितीत प्रश्न असा निर्माण होतो की हल्लेखोर सैफच्या घरात कसा घुसला? मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे डीसीपी दीक्षित गेडाम म्हणाले की, त्यांना पहाटे ३ वाजताच्या सुमारास माहिती मिळाली की अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. सध्या सैफ रुग्णालयात आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अभिनेता आता धोक्याबाहेर आहे. पोलिसांनी अभिनेत्याशी काहीही बोलणं झालेलं नाही या हल्ल्यात सैफ अली खानच्या घरी काम करणारी महिला कर्मचारीही जखमी झाली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, आम्ही केलेल्या तपासात चोरीचा एक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी हा चोरी करण्याच्या उद्देशाने चोरी करायला गेला होता. तसेच आरोपी पायऱ्यांमधून घरात घुसला होता. त्याचा शोध सुरू आहे.”, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
ताज्या माहितीनुसार, मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना पोलिस ठाण्यात नेले आहे. येथे त्याची चौकशी केली जात आहे. जेव्हा अज्ञात व्यक्ती घरात शिरली तेव्हा महिला कर्मचाऱ्यांनी त्याला पाहिले आणि त्यांनी ओरडण्यास सुरुवात केली. यानंतर त्यावेळी घरात उपस्थित असलेला सैफ अली खान त्याच्याकडे आला. यानंतर हाणामारी झाली आणि महिला कर्मचारी तिच्या हाताला जखमी झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणीही येताना किंवा जाताना दिसत नाही. मुख्य गेटमधून कोणीही आत आले नाही. पोलिसांना अद्याप जबरदस्तीने प्रवेश केल्याचे कोणतेही चिन्ह सापडलेले नाही. ही घटना घडली तेव्हा सैफ, करीना आणि त्यांची दोन्ही मुले घरीच होती. हल्ल्यानंतर सैफ अली खानच्या घरातून पोलिसांना पाचारण करण्यात आले.
मुंबई पोलिसांनी सांगितले की, त्यांनी घटनेच्या दोन तासांपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले आहे. फुटेजमध्ये कोणीही आत जाताना दिसत नाही. अशा परिस्थितीत, हल्लेखोर आत असल्याचा पोलिसांना संशय आहे. मुंबई पोलिसांचे पथक सैफ अली खानच्या घरी पोहोचले आहे आणि प्रत्येक कोनातून तपास करत आहे. अभिनेत्याच्या घरातील पाच कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे.