Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मनाचे श्लोक’मधून “लीना भागवत-मंगेश कदम” मोठ्या पडद्यावर आमनेसामने

लीना भागवत आणि मंगेश कदम ही लोकप्रिय जोडी पहिल्यांदाच ‘मनाचे श्लोक’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. हा चित्रपट १० ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 26, 2025 | 06:17 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

‘आमने सामने’, ‘इवलेसे रोप’, ‘तू अभी तक है हसीन’ अशा लोकप्रिय नाटकं, मालिका आणि वेब सिरीजमधून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी जोडी म्हणजे लीना भागवत आणि मंगेश कदम. त्यांच्या अप्रतिम टायमिंग आणि हसवणाऱ्या केमिस्ट्रीमुळे ही जोडी रंगभूमीवर आणि छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून बसली आहे. आता हीच जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दिसणार असून, ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

आर्यन खानविरुद्धच्या मानहानी प्रकरणात समीर वानखेडेला झटका, हायकोर्टाने फेटाळली याचिका

प्रत्यक्ष आयुष्यात पती-पत्नी असलेले लीना आणि मंगेश पडद्यावर देखील एकमेकांना नेहमीच उत्तम साथ देताना दिसले आहेत. त्यामुळे या चित्रपटात त्यांची जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या अनुभवाबद्दल बोलताना लीना भागवत म्हणाल्या, ” मराठी प्रेक्षकांनी आम्हाला रंगभूमीवर नेहमीच प्रचंड प्रेम दिलं. आता पहिल्यांदाच आम्ही ‘मना’चे श्लोक’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहोत. यासाठी प्रेक्षकांप्रमाणे आम्हीही उत्सुक आहोत. पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र काम करणं ही नवी आणि सुंदर अनुभूती आहे. मला खात्री आहे प्रेक्षक आम्हाला मोठ्या पडद्यावरही तेवढंच प्रेम देतील.”

मंगेश कदम म्हणाले, “नाटक आणि चित्रपटाचा अनुभव वेगळा असतो. मात्र लीनासोबत स्क्रीन शेअर करणं हे नेहमीच मजेशीर आणि समाधानकारक असतं. ‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट आमच्यासाठीही खास आहे, कारण यात आमची जोडी एका वेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत आहे.” या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी केले असून, निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा आहेत. ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब यांसारखे दमदार कलाकार देखील झळकणार आहेत.

Bigg Boss 19: गौहर खान ‘विकेंड का वॉर’ला ‘बिग बॉस’च्या घरात करणार एन्ट्री, ‘या’ स्पर्धकांचा घेणार क्लास

‘स्टारलाईट बॉक्स थिएटर्स’ आणि ‘नितीन वैद्य प्रॉडक्शन्स’च्या बॅनरखाली साकारलेला हा चित्रपट १० ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट म्हणजे एक मोठं सरप्राईज ठरणार आहे.

Web Title: Leena bhagwat from manache shlok

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2025 | 06:17 PM

Topics:  

  • marathi cinema

संबंधित बातम्या

दिवंगत अभिनेते राजेश पिंजानी यांचा शेवटचा चित्रपट, ‘गोट्या गँगस्टर’चा टीझर लाँच
1

दिवंगत अभिनेते राजेश पिंजानी यांचा शेवटचा चित्रपट, ‘गोट्या गँगस्टर’चा टीझर लाँच

‘दशावतार’नंतर सिद्धार्थ मेनन गाण्यातून करणार धमाका, ‘मना’चे श्लोकमधील ‘हैय्या हो’ गाणं प्रदर्शित
2

‘दशावतार’नंतर सिद्धार्थ मेनन गाण्यातून करणार धमाका, ‘मना’चे श्लोकमधील ‘हैय्या हो’ गाणं प्रदर्शित

दिग्दर्शकानं ‘बाबुली’ समोर जोडले हात, कोट्यवधी कमवणाऱ्या दशावतारचा दुसऱ्या सोमवारी गल्ला किती?
3

दिग्दर्शकानं ‘बाबुली’ समोर जोडले हात, कोट्यवधी कमवणाऱ्या दशावतारचा दुसऱ्या सोमवारी गल्ला किती?

रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’मध्ये झळकणार ‘हा’ TV अभिनेता, वर्षानुवर्षांच स्वप्न झालं पूर्ण
4

रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’मध्ये झळकणार ‘हा’ TV अभिनेता, वर्षानुवर्षांच स्वप्न झालं पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.