Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभि आणि कृतिकाची लगीनघाई! ‘लग्नाचा शॉट’ या आगामी चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित

मराठी चित्रपटांची चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसत आहे. अशातच आता आणखी एक मराठी चित्रपट सिनेमागृहात धुमाकूळ घालायला येत आहे, ज्याचं नाव आहे ‘लग्नाचा शॉट’. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 22, 2026 | 12:13 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • अभि आणि कृतिकाची लगीनघाई
  • ‘लग्नाचा शॉट’ चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित
  • ‘लग्नाचा शॉट’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित
 

लग्न म्हणजे आनंद, गडबड, नात्यांची गुंफण आणि अनेक अनपेक्षित क्षणांचा संगम आणि हाच संगम मोठ्या पडद्यावर मांडण्यासाठी येत आहे आगामी मराठी चित्रपट ‘लग्नाचा शॉट’. या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच एका खास आणि हटके वातावरणात प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर लाँच हा सोहळा चक्क खऱ्या लग्नघरासारखा साकारण्यात आला होता, ज्यामुळे उपस्थितांना हा केवळ ट्रेलर लाँच न वाटता जणू प्रत्यक्ष लग्नसमारंभाचाच अनुभव मिळाला आहे.

यावेळी ढोल ताशांच्या गजरात अभिजीत आमकर याची घोड्यावरून वरात आली तर वाजतगाजत प्रियदर्शिनी इंदलकर पालखीतून आली. या खास सोहळ्याला लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी यांची देखील उपस्थिती लाभली, ज्यामुळे कार्यक्रमात विशेष रंगत पाहायला मिळाली आहे. संपूर्ण वातावरणात लग्नाची लगबग, उत्साह आणि गोंधळ अनुभवायला मिळत आहे, अगदी चित्रपटाच्या संकल्पनेप्रमाणेच हा कार्यक्रम पार पडला आहे.

Oscars 2026 Nomination: ९८ व्या अकादमी पुरस्कारांची आज घोषणा; जाणून घ्या कोणता भारतीय चित्रपट शर्यतीत?

ट्रेलरमध्ये एका लग्नाच्या तयारीपासून सुरू होणारी गोष्ट पुढे कशी अनपेक्षित वळणं घेते, याची रंजक झलक पाहायला मिळते. चुकीचे निर्णय, नात्यांमधील गैरसमज आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ हे सगळं अगदी हलक्याफुलक्या, विनोदी शैलीत प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे. अभि आणि कृतिकाच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या घटनांमुळे त्यांचा प्रवास वेगळ्याच दिशेने वळतो. या प्रवासात अनेक मजेशीर प्रसंगांसोबत काही भावनिक क्षणही पाहायला मिळतात.

 

या सगळ्याबद्दल सांगताना दिग्दर्शक अक्षय गोरे म्हणाले, “लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा सोहळा आहे. त्या एका दिवसासाठी अनेक स्वप्नं, अपेक्षा आणि भावना गुंफलेल्या असतात. पण अनेकदा या आनंदाच्या क्षणांमध्ये काही अनपेक्षित गोष्टी घडतात आणि संपूर्ण आयुष्याला वेगळं वळण मिळतं. ‘लग्नाचा शॉट’ची कथा अशाच अनपेक्षित प्रसंगांमधून आकाराला आली आहे. या चित्रपटातून आम्ही नुसतं हसवणारं मनोरंजन न देता, नात्यांमधील गोंधळ, गैरसमज आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रवास हलक्याफुलक्या पद्धतीने मांडला आहे. प्रेक्षकांनी थिएटरमध्ये येऊन या प्रवासाचा आनंद घ्यावा आणि स्वतःला या गोष्टींशी कुठेतरी जोडून घ्यावं, अशी माझी मनापासून इच्छा आहे.”

Star Pravah : मातीची ओढ, प्रेमाचा ध्यास…दुष्यंतचा नवा प्रवास! हळद रुसली कुंकू हसलं मालिकेत अभिनेता जगणार शेतकऱ्याचं आयुष्य

महापर्व फिल्म्स निर्मित आणि जिजा फिल्म कंपनी यांच्या सहयोगाने साकारलेल्या ‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अक्षय गोरे यांनी केले आहे. गीत-संगीताची धुरा प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी सांभाळली असून अक्षय महादेव गोरे, विजय महादेव गोरे, अभिषेक उत्कर्ष कोळी आणि सुरेश मगनलाल प्रजापती हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटात प्रियदर्शिनी इंदलकर, अभिजीत आमकार, प्रभाकर मोरे, अभिजीत चव्हाण, राजन ताम्हाणे, लीना पंडित, संजय कुलकर्णी, विजय पवार, मनोहर जाधव, संजीवनी पाटील यांच्या प्रमुख भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. तसेच हा चित्रपट येत्या ६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.

Web Title: The upcoming marathi movie lagnacha shot trailer released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • Marathi News

संबंधित बातम्या

Oscars 2026 Nomination: ९८ व्या अकादमी पुरस्कारांची आज घोषणा; जाणून घ्या कोणता भारतीय चित्रपट शर्यतीत?
1

Oscars 2026 Nomination: ९८ व्या अकादमी पुरस्कारांची आज घोषणा; जाणून घ्या कोणता भारतीय चित्रपट शर्यतीत?

‘Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam’ चित्रपटाने दिलं मराठी शाळांच्या शिक्षक अन् विद्यार्थ्यांना नवं बळ!
2

‘Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam’ चित्रपटाने दिलं मराठी शाळांच्या शिक्षक अन् विद्यार्थ्यांना नवं बळ!

आमिर खानने केला गौरीचा मनापासून स्वीकार, वयाच्या 60 व्या वर्षी तिसरे लग्न? म्हणाले ‘आम्ही पार्टनर आहोत…’
3

आमिर खानने केला गौरीचा मनापासून स्वीकार, वयाच्या 60 व्या वर्षी तिसरे लग्न? म्हणाले ‘आम्ही पार्टनर आहोत…’

आता जावेद जाफरीने AR Rahman यांना दिली साथ, वाढत्या वादाबद्दल स्पष्टच म्हणाले; ‘जगाप्रमाणे इंडस्ट्रीही बदलली…’
4

आता जावेद जाफरीने AR Rahman यांना दिली साथ, वाढत्या वादाबद्दल स्पष्टच म्हणाले; ‘जगाप्रमाणे इंडस्ट्रीही बदलली…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.