आजारपणातुन बरं झाल्यानंतर अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) सिनेसृष्टीत चांगलाच अॅक्टीव्ह झाला आहे. त्याचा मराठी चित्रपट एक अनोखी प्रदर्शित झाला असुन त्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.आता श्रेयल लवकरच पुन्हा एका मोठ्या चित्रपटातुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज महाशिवरात्रीच्या औचित्यावर त्याने नव्या चित्रपटाची घोषणा केली. लव यू शंकर (Luv You Shankar ) असं चित्रपटाचं नाव आहे. चित्रपटाच्याघोषणेसोबतच त्याचा लेटेस्ट टीझर रिलीज करण्यात आला आहे. श्रेयस तळपदेच्या या चित्रपटाच्या टीझरमधील व्हीएफएक्स पाहून प्रत्येकजण प्रभावित होत आहे.
[read_also content=”बहुप्रतिक्षित मैदान चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज,भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ पाहता येणार मोठ्या पडद्यावर! https://www.navarashtra.com/photos/maidaan-trailer-realsed-movie-based-on-indian-football-coach-syed-abdul-rahim-513685.html”]
आपल्या शानदार अभिनयाने आणि कॉमिक टायमिंगने श्रेयस तळपदे चित्रपटांमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो. काही महिन्यांपूर्वी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता त्यानंतर त्याने ब्रेक घेतला. आता तो पूर्णपणे बरा झाला असून अभिनयाच्या दुनियेत परतण्यासाठी सज्ज झाला आहे.
श्रेयस तळपदेच्या आगामी ‘लव्ह यू शंकर’ या चित्रपटाचा नवीनतम टीझर रिलीज झाला आहे, जो श्रेयसने स्वत: त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. या टीझर व्हिडिओमध्ये VFX च्या माध्यमातून महादेव नगरी काशीची दृश्यं दाखवण्यात आली आहेत.
यानंतर श्रेयस तळपदेही हातात त्रिशूल घेऊन दिसत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री तनिषा मुखर्जीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र, या टीझरवरून चित्रपटाची कथा काय असेल याचा अंदाज लावता येत नाही. मात्र या टीझरचे खूप कौतुक होत आहे.
महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर श्रेयस तळपदेने भगवान शिवाला समर्पित लव्ह यू शंकर या चित्रपटाची घोषणा केली. याच्या रिलीज डेटबद्दलही त्यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार येत्या नवरात्रीमध्ये हा चित्रपट १९ एप्रिल रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.