Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय दूरदर्शनवर पहिली AI-आधारित मालिका, ‘महाभारत: एक धर्मयुद्ध’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

भारतातील पहिली AI-आधारित प्रीमियम एंटरटेनमेंट मालिका ‘महाभारत: एक धर्मयुद्ध’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. असा अनुभव जो भारतीय टेलिव्हिजनवर यापूर्वी कधीही पाहिला गेला नाही

  • By अमृता यादव
Updated On: Oct 20, 2025 | 04:40 PM
(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

स्टार प्लस, जिओस्टार आणि कलेक्टिव मीडिया नेटवर्क मिळून भारतीय दूरदर्शनच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे. भारतातील पहिली AI-समर्थित प्रीमियम एंटरटेनमेंट मालिका ‘महाभारत: एक धर्मयुद्ध’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.ही भव्य पौराणिक गाथा २६ ऑक्टोबरपासून स्टार प्लसवर प्रसारित होणार आहे. तर याचं डिजिटल प्रीमियर २५ ऑक्टोबर रोजी जिओहॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे.या मालिकेद्वारे स्टार प्लस आपली ती गौरवशाली परंपरा पुढे नेत आहे. अशी परंपरा जी पिढ्यानपिढ्या भारतीय प्रेक्षकांना भव्य आणि अनोखा मनोरंजन देत आली आहे.‘महाभारत: एक धर्मयुद्ध’ हे AI च्या साहाय्याने एका नव्या रूपात सादर करण्यात येणार आहे. यात पौराणिक कथा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मानवी भावना यांचा अद्भुत संगम प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. असा अनुभव जो भारतीय टेलिव्हिजनवर यापूर्वी कधीही पाहिला गेला नाही.

१०० एपिसोडची ही भव्य मालिका पांडव आणि कौरव यांच्यात झालेल्या अमर युद्धाला एका नव्या रूपात प्रेक्षकांसमोर आणणार आहे. ही कथा इतक्या सुंदर आणि प्रभावी पद्धतीने सादर केली गेली आहे की प्रेक्षक त्यातील भावना आणि भव्यता यामध्ये हरवून जातील.AI-आधारित स्टोरीटेलिंगच्या मदतीने हा शो भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा आणि भविष्याच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा एक अनोखा संगम घडवतो आहे.

“मी करंजीसारखी..”,शिवानी सोनार लग्नानंतर साजरी करणार पहिली दिवाळी, अंबरकडून मिळणार सरप्राइज

ट्रेलर लॉन्चच्या वेळी कलेक्टिव आर्टिस्ट नेटवर्कचे संस्थापक आणि ग्रुप सीईओ विजय सुब्रमण्यम म्हणाले, “आपल्यापैकी अनेकांसाठी महाभारत ही फक्त एक कथा नाही, तर आपल्या आई-वडिलांकडून आणि आजी-आजोबांकडून ऐकलेली गोष्ट आहे. हा ट्रेलर म्हणजे पुढे येणाऱ्या भव्य अनुभवाची फक्त एक झलक आहे. हा अनुभव भावना, भव्यता आणि पूर्णपणे गुंतवून ठेवणारा असेल.”

 

Colours Marathi Serial:‘बाईपण जिंदाबाद’ नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ सात लोकप्रिय अभिनेत्री एकत्र दिसणार

जिओ स्टारचे सीईओ  एंटरटेनमेंट केविन वाझ यांनी ट्रेलर लॉन्चच्या वेळी सांगितले, “‘महाभारत: एक धर्मयुद्ध’ हा आमच्या विश्वासाचा उत्सव आहे. असा संगम ज्यात अमर महाकाव्य आणि मशीन इंटेलिजन्स एकत्र येऊन नव्या भारताची आत्मा सादर करतात. या मालिकेद्वारे आम्ही परंपरा आणि भविष्य यांच्यात एक मजबूत पूल उभा करत आहोत.”‘महाभारत: एक धर्मयुद्ध’ या मालिकेसोबत स्टार प्लस एक मोठं पाऊल पुढे टाकत आहे. या शोमध्ये प्रेक्षकांना पौराणिकता आणि आधुनिकतेचा अप्रतिम संगम अनुभवता येणार आहे.

Web Title: Mahabharat ek dharmyudh trailer first trailer of ai generated mahabharat released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 04:40 PM

Topics:  

  • Hindi Actress
  • Mahabharata war
  • new show

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.