Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्र्यांकडून अभिनेता गोविंदाच्या प्रकृतीबाबत विचारपूस

गोविंदाची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्या जवळचे नातेवाईक आणि सेलिब्रिटी फ्रेंड्स त्याला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनही अभिनेता गोविंदाच्या प्रकृतीबाबत विचारपूस करण्यात आली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Oct 01, 2024 | 04:49 PM
मुख्यमंत्र्यांकडून अभिनेता गोविंदाच्या प्रकृतीबाबत विचारपूस

मुख्यमंत्र्यांकडून अभिनेता गोविंदाच्या प्रकृतीबाबत विचारपूस

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता गोविंदच्या पायाला गोळी लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेता त्याचे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर साफ करत असताना हा अपघात झाला. यादरम्यान गोविंदाला गोळी लागल्याने त्याच्या पायाला मोठ दुखापत झाली आहे. त्यानंतर त्याला तातडीने मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पायातून गोळी काढण्यात आली असून सध्या त्याच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. गोविंदाची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्या जवळचे नातेवाईक आणि सेलिब्रिटी फ्रेंड्स त्याला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनही अभिनेता गोविंदाच्या प्रकृतीबाबत विचारपूस करण्यात आली आहे.

हे देखील वाचा – गोविंदाच्या पायाला गोळी कधी आणि कशी लागली? भाऊ कीर्ती कुमारने सांगितले अपघाताचे सत्य!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता गोविंदा यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यासोबत झालेल्या अपघातातबाबत विचारपूस केली. राज्य शासन आणि जनतेच्यावतीने लवकर बरे होण्यासाठी त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. गोविंदा आणि त्यांच्या कुटुंबियांना या कठीण काळात सर्व आवश्यक मदत मिळेल याची खात्री मुख्यमंत्री यांनी दिली. तसेच आमच्या सदिच्छा आणि प्रार्थना त्यांच्यासोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत असल्याचेही त्यांनी सांगितले.

गोविंदाच्या पायाला गोळी लागल्याची बातमी कळताच कश्मिरा शाहने तातडीने हॉस्पिटल गाठले. यावेळी अभिनेत्री हॉस्पिटलबाहेर दिसली. पापाराझींनी काश्मिराला पाहताच तिला घेरले. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र यावेळी कश्मिरा काहीच बोलली नाही. गोविंदाची पत्नी या मुद्द्यावर अनेकदा बोलली असून तिने कृष्णा अभिषेकसोबत जमत नसल्याचे स्पष्ट केले आहे, मात्र सर्व वाद विसरून गोविंदा भाचीच्या लग्नाला पोहोचला होता. कश्मिराही सर्व काही बाजूला ठेवून कठीण काळात गोविंदा यांच्या कुटुंबासोबत उभी राहिली आहे.

हे देखील वाचा – कश्मिरा शाह वाद विसरून पोहोचली गोविंदाला भेटायला; दिसला नाही कृष्णा अभिषेक? चाहत्यांना पडले प्रश्न

“नमस्कार, मी गोविंदा… तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने मी अगदी सुखरूप आहे. माझ्या पायाला गोळी लागली होती, ती काढण्यात आली आहे. माझ्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचे मी आभार मानतो. प्रार्थनासाठी तुम्हा सर्वांचेही धन्यवाद…” ऑडियो नोटच्या माध्यमातून गोविंदाने पहिली प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. परवाना असलेले रिव्हॉल्व्हर साफ करत असताना त्याला गोळी लागली. त्याच्या गुडघ्याजवळ गोळी लागली असून अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोविंदा पहाटे ४.४५ वाजता शूट करण्यात आला. त्यानंतर त्यांना मुंबईतील घराजवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोविंदा कोलकात्याला जाण्याच्या तयारीत असताना त्याच्या गुडघ्यात गोळी लागली. परवानाधारक रिव्हॉल्व्हर तपासत असताना त्याचा नेम चुकला आणि अभिनेता जखमी झाला.

Web Title: Maharashtra cm eknath shinde wishes speedy recovery to actor govinda after bullet wound due to misfire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2024 | 04:49 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.