Shivali Parab London Trip Photos
'कल्याणची चुलबुली' अर्थात शिवाली परबने आपल्या कॉमेडीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या शिवालीने इन्स्टाग्रामवर काही तासांपूर्वीच लंडनमधील स्टायलिश फोटो शेअर केले होते.
शिवाली परब 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमसोबत लंडन दौऱ्यासाठी गेली होती. यावेळी त्यांनी लंडन शहराची सफरही केली. या सफर दरम्यानचे अभिनेत्रीने चाहत्यांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
"आयुष्य हा क्षणांचा संग्रह आहे, त्यामुळे त्यातील प्रत्येक क्षणाला मोजा" असं कॅप्शन देत अभिनेत्रीने सुंदर स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोंवर अभिनेत्रीच्या फॅशनचे कौतुक चाहते करीत आहेत.
पिंक कलरचा टॉप, स्कर्ट आणि शर्ट वेअर करत अभिनेत्रीने सुंदर वेस्टर्न आऊटफिट कॅरी केलेले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमधील अभिनेत्रीच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत असून तिच्या फॅशनचेही कौतुक करीत आहेत.
शिवाली परब कायमच सोशल मीडियावर सक्रिय राहते. सोशल मीडियावर ती नेहमीच चाहत्यांसोबत नवनवीन लूक शेअर करताना दिसते.
शिवाली परब लवकरच 'मंगला' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून सत्य घटनेवर आधारित असलेल्या आणि भयावह हल्ल्यातून वाचलेल्या 'मंगला' या सुप्रसिद्ध गायिकेचा जीवन प्रवास पाहायला मिळेल.