Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“…आणि हे घडलं”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबची ‘ती’ इन्स्टा पोस्ट चर्चेत

कायमच आपल्या भूमिकेने चर्चेत राहणारी शिवाली तिच्या अपकमिंग प्रोजेक्टमधून गंभीर भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही तासांपूर्वीच शिवालीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 16, 2024 | 04:57 PM
“…आणि हे घडलं”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबची ‘ती’ इन्स्टा पोस्ट चर्चेत

“…आणि हे घडलं”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबची ‘ती’ इन्स्टा पोस्ट चर्चेत

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेत्री शिवाली परब हिला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्धी दिली आहे. ‘कल्याणची चुलबूली’ म्हणून प्रसिद्धी मिळालेली शिवाली आता लवकरच एका नव्या चित्रपटाच्या आणि नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवालीने आपल्या कॉमेडीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. कायमच आपल्या भूमिकेने चर्चेत राहणारी शिवाली तिच्या अपकमिंग प्रोजेक्टमधून गंभीर भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही तासांपूर्वीच शिवालीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे.

प्रेमाचा बहर आणि हशांचा पाऊस करणार रंगमंच ‘हाऊसफुल’, नाटकाचा पहिला प्रयोग कधी होणार ?

 

शिवाली परब लवकरच ‘मंगला’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच तिच्या नव्या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. तिने या चित्रपटाबद्दलच खास इन्स्टा पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये शिवाली म्हणते, “आणि हे घडलं… प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं, आपल्याला एक भूमिका अशी मिळावी ज्यात शीर्षक भूमिका (title role) आपण करावी आणि माझ्याबरोबर हे घडलं…इतके कमालीचे कलाकार आणि पहिलाच अनुभव शशांक शेंडे आणि अलका कुबल या दिग्गज कलाकारांबरोबर मिळाला… अपर्णा हॉसिंग तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात त्याबद्दल मनापासून आभार… या सिनेमाची महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोस्थेटिक मेकअप… संजय सिंह यांनी खूप कमाल मेकअप केलाय… येत्या १७ जानेवारी २०२५ ला ‘मंगला’ हा आमचा चित्रपट येतोय … प्रेक्षकांना विनंती करते की मराठी चित्रपट आहे, सत्यघटनेवर आधारित आहे, नक्की सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट बघा.”

करीन कपूरनंतर ‘स्पिरिट’मध्ये या सुंदर अभिनेत्रीची एंट्री, प्रभाससह दिसणार मुख्य भूमिकेत!

सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘मंगला’ चित्रपटात अभिनेत्री शिवाली परब प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटात शिवालीसह शशांश शेंडे, अलका कुबलही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात सुप्रसिद्ध गायिकेचा जीवनप्रवास पाहायला मिळणार आहे. चित्रपटात शिवाली परब चेहऱ्यावर अ‍ॅसिड हल्ला झालेल्या मंगलाच्या भूमिकेत दिसणार आहे. १७ जानेवारी २०२५ रोजी ‘मंगला’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शिवाली परबच्या कामाविषयी सांगायचं तर, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’कार्यक्रमासोबतच ती इतरही प्रोजेक्ट अगदी उत्तम पद्धतीने सांभाळतेय. लवकरच अभिनेत्री मराठी रंगभूमीवर पाऊल ठेवणार आहे. प्रसाद खांडेकर लिखित, दिग्दर्शित ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाच्या माध्यमातून शिवाली रंगभूमीवर पदार्पण करत आहे. नाटकात प्रमुख भूमिकेत शिवालीसोबत प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत, भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर आणि नम्रता संभेराव पाहायला मिळणार आहे. २१ डिसेंबरपासून हे नाटक रंगभूमीवर येणार आहे.

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab shared mangala movie special post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2024 | 04:57 PM

Topics:  

  • marathi actress
  • Television Actress

संबंधित बातम्या

मालिकेतील येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज! प्राजक्ताच्या साडीवर कोरले तिच्या ‘अहों’चे नाव
1

मालिकेतील येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज! प्राजक्ताच्या साडीवर कोरले तिच्या ‘अहों’चे नाव

पांढऱ्या शुभ्र मिनी ड्रेसमध्ये अश्विनी चवरेचा बार्बी लूक व्हायरल, अभिनेत्रीच्या फॅशन अन् ग्लॅमरची चर्चा
2

पांढऱ्या शुभ्र मिनी ड्रेसमध्ये अश्विनी चवरेचा बार्बी लूक व्हायरल, अभिनेत्रीच्या फॅशन अन् ग्लॅमरची चर्चा

‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सुरु केला नवा व्यवसाय;  रेस्टॉरंटचा फोटो शेअर करत म्हणाली आयुष्यात पुढचं पाऊल….
3

‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सुरु केला नवा व्यवसाय; रेस्टॉरंटचा फोटो शेअर करत म्हणाली आयुष्यात पुढचं पाऊल….

किलर गर्लच्या सौंदर्याने केले Kill! हृदयाच्या किल्ल्याचा किल्लेदार ‘जान्हवी किल्लेकर’
4

किलर गर्लच्या सौंदर्याने केले Kill! हृदयाच्या किल्ल्याचा किल्लेदार ‘जान्हवी किल्लेकर’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.