राजीनामा दिल्यानंतर हेमा कमिटीविषयी मोहनलालची पहिल्यांदाच प्रतिक्रिया
Malyalam Superstar Mohanlal Reaction On Hema Committee : केरळमधील मल्याळम सिनेसृष्टीमध्ये अनेक वर्षांपासून अभिनेत्रींचं लैंगिक शोषण त्यासोबतच दुय्यम वागणूक आणि त्यांचा मानसिक छळ केला जातो, अशी माहिती हेमा समितीच्या एका अहवालातून समोर आला होता. केरळ राज्य सरकारने हा रिपोर्ट जाहीर केल्यानंतर यावर अनेक टीका- टीप्पणी केली. शिवाय, मल्याळम इंडस्ट्रीतल्या सहअभिनेत्री समोर येत आपल्यासोबत झालेल्या अत्याचाराला वाचा फोडत आहे. या रिपोर्टमुळे आता मल्याळम सिनेसृष्टी चांगलीच हादरली आहे.
हे देखील वाचा – “फ्लावर समझे क्या, फायर है अपुन…” शिव ठाकरेचा खतरनाक लूक पाहिलात का ?
दरम्यान, असोसिएशन ऑफ मल्याळम मुव्ही आर्टसचे अध्यक्ष सुपरस्टार मोहनलाल यांनी अध्यक्ष पदावरून राजीनामा दिला आहे. एकंदरीतच आता या प्रकरणावर सुपरस्टार मोहनलाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तिरुवनंतपुरममध्ये एका इव्हेंटला अभिनेत्याने उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी माध्यमांसोबतही संवाद साधला. सुपरस्टार मोहनलाल मुलाखती दरम्यान म्हणाले, “हेमा कमिटीने सादर केलेला रिपोर्ट सहाजिकच स्वागताहार्य आहे. मी समितीच्या समोर आजवर दोन वेळा आलेलो आहे. मी विनंती करतो की, कृपया मल्याळम इंडस्ट्रीला बरबाद करू नका. सादर केलेल्या रिपोर्टचे आम्ही स्वागत करत असून सादर केलेला अहवाल हा सरकारचा योग्य निर्णय होता.”
सुपरस्टार मोहनलाल मुलाखतीमध्ये पुढे म्हणाले, “मी गेल्या दोन वर्षांपासून AMMA चे अध्यक्षपद सांभाळले आहे. समितीने सादर केलेल्या रिपोर्टवर उत्तर देणं मल्याळम इंडस्ट्रीला बंधनकारक आहे. आपण बघितलं असेल तर, AMMA लाच सर्व प्रश्नांची उत्तरे विचारली जात आहेत. असोसिएशन सर्वच प्रश्नांची उत्तर देण्यास बांधील नाही. प्रत्येकाला प्रश्न विचारली पाहिजेत. मल्याळम इंडस्ट्री फार मेहनती आहे. इंडस्ट्रीमध्ये असे अनेक लोकं आहेत, ज्यांना आपण दोषी ठरवू शकत नाहीत. जे जबाबदार आहेत, दोषी आहेत त्यांना नक्कीच शिक्षा मिळेल. पण तुम्ही कृपया करून इंडस्ट्रीला संपवू नका. ” अशी प्रतिक्रिया अभिनेत्याने मुलाखतीमध्ये दिली आहे.