manoj bajpayee
सध्या दाक्षिणात्य चित्रपट (South Indian Movies) बॉलिवूड चित्रपटांच्या तुलनेत बॉक्स ऑफिसवर (Box Office) तुफान चालताना दिसत आहेत. यावर अभिनेता मनोज बाजपेयीनं आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘केजीएफ चॅप्टर २’, ‘आरआरआर’ आणि ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटांच्या यशाबद्दल बोलताना याचा बॉलिवूडवर काय परिणाम झाला यावर मनोज बाजपेयीनं (Manoj Bajpayee) वक्तव्य केलं आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मनोज बाजपेयी म्हणाला, “आता वेळ आली आहे की बॉलिवूड फिल्ममेकर्सनी दाक्षिणात्य चित्रपटांना मिळत असलेल्या यशाकडे बघून काहीतरी शिकायला हवं. त्यांच्या चित्रपटांना एवढं यश मिळण्याचं कारण काय आहे हे समजून घ्यायला हवं. कोरोनानंतर आलेला अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ तुफान चालला आणि तिथूनच हिंदी भाषेतही दाक्षिणात्य चित्रपटाच्या वचर्स्वाला सुरुवात झाली.”
लॉकडाऊननंतर जेव्हा पुष्पा चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी त्याच्या हिंदी वर्जननं जवळपास १०६ कोटींची कमाई केली. त्यानंतर प्रदर्शित झालेले ‘आरआरआर’ आणि ‘केजीएफ चॅप्टर २’ या चित्रपटांच्या हिंदी व्हर्जनलाही तुफान प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला. या चित्रपटांना मिळत असलेल्या यशानं बॉलिवूड फिल्म मेकर्सना विचार करण्यास भाग पाडलं आहे. अलिकडेच राम गोपाल वर्मा आणि इतर अनेक दिग्दर्शक निर्मात्यांनी यावर आपल्या समस्या सांगितल्या आहेत.
या सर्व मुद्द्यावर मनोज बाजपेयी म्हणाला, “हे चित्रपट एवढे ब्लॉकबस्टर ठरत आहेत… माझ्यासारख्या लोकांना विसरूनच जा. या चित्रपटांना मिळणाऱ्या यशामुळे तर बॉलिवूड इंडस्ट्री हादरली आहे. कोणालाच समजत नाहीये की काय करावं, कुठे पाहावं. या चित्रपटांना मिळाणार यश ही बॉलिवूडला मिळालेली चपराक आहे. यातून बॉलिवूडनं काहीतरी शिकायला हवं. प्रेक्षकांचा सन्मान आणि त्यांचं प्रेम सर्वात महत्त्वाचं आहे.”
[read_also content=”संजय पांडे आणि ठाकरे सरकारविरोधात किरीट सोमय्यांची कायदेशीर लढाई, कोर्टात दाखल केली जनहित याचिका https://www.navarashtra.com/gallery/kirit-somaiyas-pil-against-police-commisioner-sanjay-pande-and-thackeray-government-nrsr-274124/”]
दाक्षिणात्य मेकर्स आणि दिग्दर्शकांबद्दल बोलताना मनोज बाजपेयी पुढे म्हणाले, “ते आपल्या कामाबाबत खूप पॅशनेट आहेत. चित्रपटाचा कोणताही शॉट घेत असताना ते असा घेतात जसं की जगातील बेस्ट शॉट शूट करत आहेत. आरआरआर पाहिल्यावर लक्षात येईल की यातील प्रत्येक फ्रेम अशी शूट करण्यात आली आहे की त्यापेक्षा बेस्ट काहीच असू शकत नाही. तो आयुष्यातला अखेरचा शॉट असावा असं वाटतं. हीच गोष्ट आपल्याकडे कमी आहे. आपल्याकडे चित्रपट फक्त पैसे कमावण्यासाठी तयार केले जातात. आपण स्वतःचं परीक्षण करत नाही. यातून मेनस्ट्रीम चित्रपट कसा तयार करावा हे बॉलिवूड इंडस्ट्रीनं शिकायला हवं.”