Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

चाहत्यांची लाडकी ‘शेवंता’ अर्थात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने लग्नगाठ बांधली असून फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिलाय. तिचे फोटो फारच कमी वेळात व्हायरल होत आहेत, पहा लुक

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 15, 2026 | 09:54 PM
अपूर्वा नेमळेकर झाली मिसेस गोवलकर, शेअर केली गोड बातमी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

अपूर्वा नेमळेकर झाली मिसेस गोवलकर, शेअर केली गोड बातमी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • अपूर्वा नेमळेकरने बांधली लग्नगाठ 
  • तनुज गोवलकरसह अपूर्वाने केले लग्न 
  • सोशल मीडियावर फोटो व्हायरल 
गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मालिकांमधून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने १४ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली आहे आणि फोटो शेअर करत तिने आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिलाय. अपूर्वाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या लग्नाचे फोटो शेअर तर केलेच याशिवाय आपल्या नवऱ्याबद्दल माहितीही दिली आहे. इतकंच नाही तर इन्स्टावर तिने आपले नाव अपूर्वा नेमळेकर गोवलकर असंही केलं आहे. याशिवाय पोस्टच्या शेवटी तिने Mrs. Apurva Tanuj Govalkar असं लिहीत नवऱ्यावरील आपलं प्रेमही व्यक्त केलं आहे. 

भावाच्या आठवणीत अपूर्वा नेमळेकरची भावूक पोस्ट; म्हणाली, ‘कदाचित, मी तो दिवस बदलू शकले असते तर…’

अपूर्वाची नवऱ्यासाठी खास पोस्ट 

अपूर्वाने नवऱ्यासह फोटो शेअर करत चाहत्यांना आपल्या लग्नाची माहिती दिली आहे. तिने अगदी मनापासून म्हटलं की, 

‘१४ फेब्रुवारी २०२६ — एक अशी तारीख जी कायमची आमची झाली. ❤️

काल, प्रेम, विश्वास आणि आमच्या जवळच्या आशीर्वादांच्या उपस्थितीत, आम्ही आमच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय एकत्र सुरू केला. माझ्या अंतःकरणातील अपार कृतज्ञतेसह, मला हे सांगण्यास आनंद होत आहे की मी आता श्रीमती अपूर्वा तनुज गोवलकर आहे.

आयुष्याने माझी परीक्षा घेतली आहे, मला आकार दिला आहे, मला तोडले आहे आणि मला पुन्हा बांधले आहे… आणि तरीही, मी प्रेमावर विश्वास ठेवणे कधीही थांबवले नाही. सर्व वादळांनंतर, देवाने मला शांती दिली. सर्व प्रतीक्षेनंतर, त्याने मला सहवास दिला. आणि व्हॅलेंटाईन डे वर, प्रेमाला त्याचे घर सापडले.

ही आमची दुसरी सुरुवात आहे – परिपक्वता, समजूतदारपणा आणि एकमेकांबद्दल खोल असणाऱ्या आदराने आम्ही एकमेकांना निवडले. आम्ही पूर्ण अंतःकरणाने आणि हात जोडून या प्रवासात पाऊल ठेवतोय, तुमचे आशीर्वाद, प्रेम आणि शुभेच्छा मागत आहोत आणि आम्ही एकत्र आयुष्य जगण्याला सुरूवात करतोय 

माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात माझ्यासोबत उभे राहिल्याबद्दल धन्यवाद. आज, मी पूर्ण, कृतज्ञ आणि मनापासून आनंदी आहे.

आपलीच 

सौभाग्यवती अपूर्वा तनुज गोवलकर’

“प्रवास सोप्पा नव्हता, काही कलाकार सोडून गेले…” अपूर्वाचा रोख कोणाकडे? शेवटच्या दिवसाच्या शूटिंगनंतर केली पोस्ट

अपूर्वाचे दुसरे लग्न 

पहिल्या लग्नात अपूर्वाला बराच त्रास सहन करावा लागल्याचे तिने अनेक मुलाखतीमध्ये सांगितलं होतं आणि योग्य वेळ आल्यावर आणि योग्य माणूस आयुष्यात आल्यावर लग्न करेन असंही तिने मत व्यक्त केलं होतं. १४ फेब्रुवारी हा जगभरात प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि अपूर्वानेही हाच प्रेमाचा दिवस निवडत दुसरं लग्न केल्याचं समोर आलंय. चाहत्यांनी तिला कमेंट्समध्ये भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. इतकंच नाही तर अनेक कलाकारांनीही तिला शुभेच्छा दिल्यात. 

वाचा पोस्ट 

 

Web Title: Actress apurva nemlekar got married with tanuj govalkar photos viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 09:54 PM

Topics:  

  • Entertainment marathi
  • Entertainment News
  • marathi actress

संबंधित बातम्या

”मी आधी नास्तिक होते, पण…”, रिंकु राजगुरूने सांगितला केदारनाथमधील अनुभव, म्हणाली, ”माझ्या आयुष्यात..”
1

”मी आधी नास्तिक होते, पण…”, रिंकु राजगुरूने सांगितला केदारनाथमधील अनुभव, म्हणाली, ”माझ्या आयुष्यात..”

Valentines Day Special : पुन्हा पुन्हा प्रेमात पाडणारी ‘प्रेमाची गोष्ट’
2

Valentines Day Special : पुन्हा पुन्हा प्रेमात पाडणारी ‘प्रेमाची गोष्ट’

रीलस्टार प्रथमेश कदमच्या मृत्यूचे कारण आले समोर! खुद्द आईनेच व्हिडीओ शेअर करत दिली माहिती
3

रीलस्टार प्रथमेश कदमच्या मृत्यूचे कारण आले समोर! खुद्द आईनेच व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

घरबसल्या पाहा आई-लेकामधील हळुवार नात्याची गोष्ट ‘उत्तर’, ‘या’ओटीटीवर प्रदर्शित होणार,वाचा सविस्तर
4

घरबसल्या पाहा आई-लेकामधील हळुवार नात्याची गोष्ट ‘उत्तर’, ‘या’ओटीटीवर प्रदर्शित होणार,वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.