Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेता किरण मानेने शेअर केली Mufasa The Lion King साठी खास पोस्ट, केलं किंग खानचं विशेष कौतुक

शाहरूख खानचा आवाज असलेला ‘मुफासा: द लायन किंग’ला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच अभिनेता किरण मानेने खास चित्रपटासाठी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. त्याने चित्रपटाचे कौतुक केले.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 05, 2025 | 06:27 PM
अभिनेता किरण मानेने शेअर केली Mufasa The Lion King साठी खास पोस्ट, केलं किंग खानचं विशेष कौतुक

अभिनेता किरण मानेने शेअर केली Mufasa The Lion King साठी खास पोस्ट, केलं किंग खानचं विशेष कौतुक

Follow Us
Close
Follow Us:

शाहरूख खानचा आवाज असलेला ‘मुफासा: द लायन किंग’सिनेमा गेल्या वर्षी २० डिसेंबरला रिलीज झाला. चित्रपटाने पहिल्या दिवशी दमदार कमाई करत बॉक्स ऑफिसवर आपलं खातं उघडलं. २०१९ मध्ये आलेल्या ‘द लायन किंग’ चित्रपटाचा हा प्रीक्वेल आहे. भारतीय डब व्हर्जनमध्ये ‘मुफासा: द लायन किंग’ला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच अभिनेता किरण मानेने खास चित्रपटासाठी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने चित्रपटाचे कथानक सांगितले असून चित्रपटाचे विशेष कौतुक केले आहे. शिवाय अभिनेता शाहरूख खानच्या आवाजाचेही कौतुक केले आहे.

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने घेतली मर्सिडीज बेंझ, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “स्वप्नांवर प्रेम करा आणि जोखीम…”

 

शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेता म्हणतो,

“‘मुफासा’! मिलेले नावाची आपल्या मुलनिवासींची भूमी शोधायला निघालेला न्यायप्रिय, शूर आणि तितकाच संवेदनशील सिंह… तिथं पोहोचण्याचा त्याचा थरारक प्रवास सिनेमाभर आहे… भन्नाट सिनेमात रंगून गेलो. अखेर मुफासाला ती भूमी सापडते. सिनेमा पहात असताना बरोबर याच ठिकाणी एक फ्रेम पाहून काळीज लक्कन हललं. काहीतरी खुप जवळचं दिसल्यासारखं वाटलं. खुर्चीत सरसाऊन बसलो… त्यानंतरचा सिनेमा पाहताना मला लै लै लै ओळखीचं कायतरी सापडायला लागलं !!! “

“मुफासाच्या मुलनिवासींच्या भूमीत एक विलक्षण बहरलेला पिंपळवृक्ष आहे. ट्री ऑफ लाइफ. त्याखाली त्यांचा महान पूर्वज बसत असे… ही त्या भुमीची खूण, असं रफिकी मुफासाला सांगतो ! त्या पिंपळाची मुळं खुप पसरली आहेत हे कॅमेरा नीट क्लोजअप घेऊन दाखवतो… त्या भुमीत एकोप्याने, मिळून मिसळून राहणारे विविध जातींचे प्राणी असतात… अतिशय समृद्ध अशी ती भुमी असते… अचानक मुफासाचा माग काढत दुसऱ्या भूमीतून घुसखोरी करून वेगळ्याच जातीचे, थोडे वेगळे दिसणारे कारस्थानी, खूँखार सिंह येतात. ते घुसखोर सिंह या गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या प्राण्यांमध्ये फुट पाडण्याचं कपट करतात. मुफासाची खोटी बदनामी करतात. काही प्रमाणात यशस्वीही होतात. भोळ्या-भाबड्या प्राण्यांचा त्यावर विश्वास बसतो. हे घुसखोर लोक शातीर दिमाग असतात. फोडा आणि राज्य करा ही नीती चलाखीने वापरतात. पण मुफासा हुशारीनं घुसखोरांचा तो प्रयत्न हाणून पाडतो… प्रचंड रण होतं आणि तो आपल्या मुलनिवासींची भुमी वाचवतो ! मुफासा रक्ताने राजघराण्यातला नसूनही मुलनिवासी लोक त्याला आपला राजा बनवतात. मुफासा आपल्या भूमीतील एकता आणि समता जपण्यासाठी सज्ज होतो. पण घुसखोरांनी जाता-जाता मनात विष पेरलेला स्कार अजून धुसफुसतोय… वरवर त्यानं मुफासाशी हातमिळवणी केली आहे पण त्याच्या चेहऱ्यावरचा खुनशीपणा सांगतोय की हा घरचा भेदी घात करणार. स्कारच्या मदतीने ते वर्चस्ववादी घुसखोर या प्राण्यांवर वर्चस्व गाजवण्यासाठी प्रतिक्रांतीची वाट पहात दबा धरून बसलेत… ‘लोकांच्या मनावर सत्ता गाजवणारा खरा सत्ताधीश असतो, लोकांमध्ये भेदाभेदाचं विष पेरून कारस्थानानं सत्ता मिळवायची नसते.’ हा संदेश मुफासाच्या पुढच्या पिढ्या घेतात. ‘राजा’ हा भूमीचा मालक नसतो, तर रक्षक असतो हे मनाशी बाळगून शत्रूशी मुकाबला करायला सज्ज होतात. शेवटच्या पंधरा मिनिटात अचानक अनपेक्षितरित्या आपल्या मातीतलं, ओळखीचं वाटावं असं सरप्राईज या सिनेमानं दिलं! आणखीही एक ‘आपला जीव’ यात आहे, तो म्हणजे मुफासाला असलेला शाहरुखचा आवाज… शारख्या, एक ही दिल है यार, कितनी बार जितोगे ! एकदा चित्रपट बघाच…”

Web Title: Marathi actor kiran mane shared mufasa the lion king movie related special post in instagram

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2025 | 06:27 PM

Topics:  

  • Bollywood Film
  • Bollywood News

संबंधित बातम्या

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद
1

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार
2

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार

The Bengal Files: ‘काश्मीरची परिस्थिती बंगालपेक्षा चांगली…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, पल्लवी जोशी संतापल्या!
3

The Bengal Files: ‘काश्मीरची परिस्थिती बंगालपेक्षा चांगली…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, पल्लवी जोशी संतापल्या!

Johnny Lever Birthday: रस्त्यावर पेन विकून जॉनी बनला ‘कॉमेडी किंग’; खडतर प्रवासाने बदलले नशीब
4

Johnny Lever Birthday: रस्त्यावर पेन विकून जॉनी बनला ‘कॉमेडी किंग’; खडतर प्रवासाने बदलले नशीब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.