Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाकुंभमेळ्यात ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याने केलं शाही स्नान; म्हणाला “जोवर तो बोलवत नाही तोवर…”

प्रयागराजमध्ये सोमवारी झालेल्या महाकुंभमेळ्यात शाहीस्नानासाठी 'जीव माझा गुंतला' फेम अभिनेता सौरभ चौघुलेनेही हजेरी लावली होती. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत थोडक्यात आपला अनुभव शेअर केला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 14, 2025 | 03:15 PM
महाकुंभमेळ्यात 'या' मराठमोळ्या अभिनेत्याने केलं शाही स्नान; म्हणाला "जोवर तो बोलवत नाही तोवर..."

महाकुंभमेळ्यात 'या' मराठमोळ्या अभिनेत्याने केलं शाही स्नान; म्हणाला "जोवर तो बोलवत नाही तोवर..."

Follow Us
Follow Us:

हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्व असलेल्या महाकुंभमेळ्याला प्रयागराजमध्ये सुरुवात झाली आहे. प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात फक्त देशातूनच नाही तर जगभरातीलही लोकं गंगेत स्नान करण्यासाठी येत आहेत. विशेष म्हणजे १४४ वर्षांनी महाकुंभमेळ्याचा योग जुळून आलाय. थेट पुढच्या २२ व्या शतकातच हा महाकुंभमेळा होणार आहे. त्यामुळे या कुंभमेळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भारतातूनच नाही तर जगभरातून साधु-संत, भाविक येत आहेत. पौष पौर्णिमा निमित्त सोमवारी पहिलं शाही स्नान पार पडलं. पुढचे 45 दिवस प्रयागराजमध्ये भक्तांचा महासागर लोटणार आहे.

२५ वर्षांपूर्वी हृतिक रोशनने डायरीत नेमकं काय लिहिलं होतं ? जे वाचून वडील राकेश रोशनही झाले होते आश्चर्यचकित…

प्रयागराजमध्ये सोमवारी झालेल्या महाकुंभमेळ्यात शाहीस्नानासाठी ‘जीव माझा गुंतला’ फेम अभिनेता सौरभ चौघुलेनेही हजेरी लावली होती. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत थोडक्यात आपला अनुभव शेअर केला आहे. अभिनेत्याने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनही देत खास व्हिडिओ शेअर केला आहे.

 

व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शन दिले की,

“अचानक जुना मित्र कुंभला जातोय असं सांगतो काय!! त्याच्या ग्रुप मधला एक मेंबर कॅन्सल होतो काय!! आणि शेवटच्या क्षणाला माझं कुंभ मेळाला जायचं ठरतं काय!! निव्वळ योगायोग असे म्हणतात जोवर तो बोलवत नाही तोवर आपलं त्याला भेटणं होत नाही. असच काहीसं हे एक, १४४ वर्षानंतर येणाऱ्या महा कुंभमेळा, असं म्हणतात तीन पिढ्या नंतर एका पिढीला हा योग मिळतो. आणि मला तो मिळाला. देवाचे खूप खूप आभार. धर्म, ज्ञान आणि नवनवीन व्यक्तींची भेट खरंच खूप काही शिकवून जातं. || हर हर गंगे, हर हर महादेव ||”

सतीश राजवाडेंच्या नव्या चित्रपटाची घोषणा, प्रेमाचा इफेक्ट असणारी मनातली स्पेशल गोष्ट ‘प्रेमाची गोष्ट २’मधून उलगडणार

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेता ऐन थंडीच्या कडाक्यात नदीमध्ये शाहीस्नान करताना दिसत आहे. अंगावर उपरणं घालून अभिनेत्याने नदीमध्ये शाहीस्नान केलेलं दिसत आहे. अभिनेत्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. अनेक चाहत्यांनी अभिनेत्याचं “हर हर महादेव…” म्हणत कौतुक केलं आहे. तर काहींनी “हर हर गंगे…”, “तुम्हे वहाका बुलाया था… हर हर महादेव…” अशा कमेंट्स अभिनेत्याच्या व्हिडिओवर केल्या आहेत.

Web Title: Marathi actor saorabh choughule attends mahakumbhmela 2025 shared his experience on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2025 | 03:15 PM

Topics:  

  • marathi actor

संबंधित बातम्या

Onkar Bhojane: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अचानक का सोडली? ओंकार भोजनेने केला मोठा खुलासा, म्हणाला- ‘माझ्यामुळे त्यांना…’
1

Onkar Bhojane: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अचानक का सोडली? ओंकार भोजनेने केला मोठा खुलासा, म्हणाला- ‘माझ्यामुळे त्यांना…’

Sumeet Raghavans Luxurious Home: अभिनयासोबत घराचीही भन्नाट पसंती! सुमीत राघवनच्या घरात संविधानासाठी खास जागा
2

Sumeet Raghavans Luxurious Home: अभिनयासोबत घराचीही भन्नाट पसंती! सुमीत राघवनच्या घरात संविधानासाठी खास जागा

Prithvik Pratap: समोर आगीच्या ज्वाळा, रात्रीचा काळोख अन् मित्रांसोबत रोड ट्रिप; पृथ्वीक प्रतापने सांगितला थरारक अनुभव
3

Prithvik Pratap: समोर आगीच्या ज्वाळा, रात्रीचा काळोख अन् मित्रांसोबत रोड ट्रिप; पृथ्वीक प्रतापने सांगितला थरारक अनुभव

Vikas Patil New Car: बर्थडेच्या दिवशी स्वतःलाच दिलं महागडं गिफ्ट; विकास पाटीलने घेतली नवी Vitara कार, किंमत आहे ‘इतकी’
4

Vikas Patil New Car: बर्थडेच्या दिवशी स्वतःलाच दिलं महागडं गिफ्ट; विकास पाटीलने घेतली नवी Vitara कार, किंमत आहे ‘इतकी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.