Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Suvrat Joshi Post : अभिनेता सुव्रत जोशीने शेअर केला कॅबमधील अनुभव, फोटो शेअर करत म्हणाला…

विराजस कुलकर्णी दिग्दर्शित ‘वरवरचे वधू-वर’ या नाटकाचे सध्या मुंबईमध्ये प्रयोग सुरू आहेत. याच नाटकाच्या प्रयोगासाठी जात असताना सुव्रतला कॅबमध्ये एक वेगळाच अनुभव आला. हा अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेता सुव्रत जोशीने कॅब चालकाचा फोटो शेअर करत आपला अनुभव शेअर केलेला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Sep 16, 2024 | 06:58 PM
अभिनेता सुव्रत जोशीने शेअर केला कॅबमधील अनुभव, फोटो शेअर करत म्हणाला...

अभिनेता सुव्रत जोशीने शेअर केला कॅबमधील अनुभव, फोटो शेअर करत म्हणाला...

Follow Us
Close
Follow Us:

‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतून अभिनेता सुव्रत जोशीला चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. सुव्रत जोशीने आपल्या प्रेक्षकांचे मराठी टेलिव्हिजन, चित्रपट, नाटक आणि वेबसीरीजच्या माध्यमातून मनोरंजन केले आहे. सध्या सुव्रत ‘वरवरचे वधू-वर’ नाटकामुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये या नाटकाचे हाऊसफुल्ल प्रयोग सुरू आहेत. सध्या मुंबईमध्ये या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. या नाटकानिमित्त अभिनेत्याला एक वेगळाच अनुभव आला आहे, तो अनुभव अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितला आहे.

हे देखील वाचा – विजय ‘थलापती 69’ साठी घेणार ‘इतकं’ मानधन, किंग खान आणि भाईजानलाही टाकलं मागे

विराजस कुलकर्णी दिग्दर्शित ‘वरवरचे वधू-वर’ या नाटकाचे सध्या मुंबईमध्ये प्रयोग सुरू आहेत. याच नाटकाच्या प्रयोगासाठी जात असताना सुव्रतला कॅबमध्ये एक वेगळाच अनुभव आला. हा अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेता सुव्रत जोशीने कॅब चालकाचा फोटो शेअर करत आपला अनुभव शेअर केलेला आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये सुव्रत म्हणतो, “काल ( १४ सप्टेंबर ) ‘वरवरचे वधू-वर’या आमच्या नाटकाचा दादरच्या शिवाजी मंदिर येथे प्रयोग होता. गणेशोत्सवामुळे दादर भागात गर्दी असणार हे अपेक्षित होतं म्हणून कॅबने जायचा विचार केला. उबेरला हे फोटोत दिसणारे सचिन भाऊ चालक म्हणून आले. त्यांनी बसल्या बसल्या माझ्याकडे बघून स्तिमित झाले आणि एक छान छान सुहास्य देऊन ओटीपी विचारला.”

“मग काही वेळाने सभ्यपणे त्यांनी मला ओळखल्याचे आणि त्यांना माझे काम आवडत असल्याचे सांगितले. पण मग लगेचच त्यांनी तुमचे नवे नाटक “वरवरचे वधू-वर”पाहायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली. हे ऐकून मात्र मी हरखून गेलो. नाटकाचा शुभारंभ झाल्यापासून ते आणि त्यांची पत्नी नाटकाला येण्यासाठी सोयीस्कर दिवस शोधत आहेत. दोघेही काम करतात आणि त्यांची कन्या अगदी लहान असल्याने अजून जमले नाही. मग मात्र मी त्यांना आग्रह धरला की चला आताच प्रयोगाला बसा. त्यांच्या पत्नीला त्यांनी व्हिडिओ कॉल लावला. साधेसे घर आणि निगुतीने सजवलेला बाप्पा पार्श्वभूमीवर होते. मी त्यांनाही आमंत्रण केले. पण घरी बाप्पा आणि मुलगी असल्याने आज जमत नसल्याचे वहिनींनी सांगितले.”

 

“त्यांच्या घरातील बाप्पाचे आणि चिमुकलीचे दर्शनही व्हिडिओ कॉलवर झाले. सचिन भाऊ तुम्ही तुमच्या सोयीने प्रयोगाला यालच, पण हा प्रसंग मला कलाकार म्हणून खूप काही देऊन गेला. मराठी नाटक हे प्रत्येक व्यवसायातील, विविध पार्श्वभूमी असलेल्या मराठी माणसाला पहावेसे वाटते ही फार दुर्मिळ आणि महत्त्वाची गोष्ट आहे. मध्यंतरी आमच्या एका प्रयोगाला एका फार मोठ्या पदावरचे सचिव गुपचूप तिकिट काढून नाटक बघून गेले आणि आता सचिन भाऊ पण येतील. मी जगभर नाटकाचे प्रयोग पाहिले. मी हिंदी नाटकाचे प्रयोग पृथ्वी थिएटर,NCPA आणि भारतभर केले. पण विशिष्ट कलाव्यवहार हा विशिष्ट वर्गापर्यंत मर्यादीत राहतो असाच माझा अनुभव. शेकस्पियर काळात कष्टकरी ते जमीनदार globe थिएटर मध्ये नाटक बघायला एकत्र यायचे.”

हे देखील वाचा – लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट, मनोरंजनाची चवदार ‘पाणीपुरी’ चित्रपटगृहात होणार दाखल!

“मराठी नाटक हे त्या कुळातील पण त्याचेच जिवंत,प्रवाही प्रारूप आहे की काय असे वाटून गेले. अर्थात याचे संपूर्ण श्रेय इथे होऊन गेलेल्या आमच्या दिग्गजांना आहे. आणि आताही भरत जाधव सर,प्रशांत दामले सर तर प्रायोगिक रंगभूमीवर अतुल पेठे यांसारख्या अनुभवी कलाकारांना आहे. त्यांचे नाटक हे भौगोलिक, सांस्कृतीक आणि आर्थिक स्तर चिरून जायचा प्रयत्न सतत करत असते. यातून जबाबदारीची जाणीव खूप वाढली. प्रत्येक माणूस नाटक बघायला येतो तेव्हा तो त्याच्या कष्टाची कमाई आपल्या प्रति खर्च करत असतो. त्यामुळे आपले सगळे बाजूला सारून त्याला एक उत्तम प्रयोग नाही देऊ शकलो तर तो नैतिक अपराध असेल असेच वाटून गेले.”

“नाट्यशास्त्र म्हणते की नाटक हे डोळे आणि कानांनी करायचा यज्ञ आहे. मी पुढे जाऊन म्हणेन की आम्ही नटानी तर सर्व इंद्रिये या आहुतीमध्ये ओतली पाहिजेत. आमचे पडद्यामागचे कलाकार त्यांच्या घामाचे धृत यात टाकतात. तसेच प्रेक्षकही यात आपल्या वेळेचे,मनाचे ,इंद्रियांचे अर्घ्य देत असतो. यातून पेटलेला हा नाट्ययज्ञ हा हिवाळी रात्री पेटवलेल्या शेकोटीप्रमाणे सर्व रसिकांना ऊब देत राहो अशी सदिच्छा.”

Web Title: Marathi actor suvrat joshi share cab driver interesting experience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2024 | 06:58 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.