“आयुष्याच्या वहीत दुमडून ठेवलेलं…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
सध्या टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्येe मालिकेची चांगलीच चर्चा होत आहे. येत्या ३० नोव्हेंबरपासून ही सीरियल बंद होणार आहे. मुख्य बाब म्हणजे, या मालिकेचा पाच वर्षांचा प्रवास आता संपणार आहे. त्यामुळे आता मालिकेतील कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून आतापर्यंतच्या प्रवासावर लिहिताना पाहायला मिळत आहे. यश म्हणजेच अभिजीतनंतर मालिकेमध्ये विशाखाचं पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री पुनम चांदोरकरने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. आता तिच्यानंतर गौरी कुलकर्णीनेही इन्स्टा पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिलेला आहे. गौरीने शेअर केलेल्या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
‘याला म्हणतात संस्कार…’ गौरव मोरेचा ‘तो’ व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांची कमेंट; अभिनेत्याचं होतंय कौतुक
नुकतीच मालिकेची शुटिंग संपली. पॅकअपच्यावेळी निर्मात्यांसह मालिकेच्या संपूर्ण टीमने शेवटचा दिवस सेलिब्रेट केला. गौरी कुलकर्णीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मालिकेत काम करण्याचा अनुभव आणि मालिका संपल्यानंतरच्या भावना पोस्ट शेअर करीत व्यक्त केल्या आहेत. पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीने एक व्हिडिओही शेअर केला आहे. या शेअर केलेल्या व्हिडिओची सुरूवात तिने मालिकेसाठी दिलेल्या ऑडिशनने होते. त्यामध्ये ती म्हणते, “तुम्ही यशला ओळखता ना? मी त्याच्याच समोरच्या बिल्डिंगमध्ये राहते.” त्याच्यापुढे मालिकेतील तिचे इतर कलाकारांसोबतचे फोटोही पाहायला मिळत आहेत.
व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीनं लिहिले की, “ऑडिशनला घातलेला ड्रेस परत फेअरवेलला घातला… कारण गौरीतली ‘गौरी’ कायम माझ्यासोबतच होती. आज निरोप देताना इमोशनल पण वाटतंय आणि आनंदही होतोय… या शोने मला सर्व दिलं… ओळख दिली… खुप चांगली माणसं दिली, अनेक अनुभव दिले… आणि तुमचं भरभरुन प्रेम दिलं..! आयुष्याच्या वहीत दुमडून ठेवलेलं खूणेचं पान… म्हणजे माझ्यासाठी ‘आई कुठे काय करते’ ही सीरियल होती आणि राहिल. ते नेहमीच खास असेल.” गौरीने या मालिकेत गौरी हे पात्र साकारले होते. संजनाची भाची आणि नंतर यशची मैत्रीण झालेल्या गौरीने तिच्या प्रेमळ स्वभावाने सर्वांची मने जिंकल्याचे पाहायला मिळाले.
अर्जुन कपूरच्या ब्रेकअपनंतर मलायका अरोराने केले मूव्ह ऑन, परदेशात घेतेय सुट्टीचा आनंद!
मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत मिलिंद गवळी, मधुराणी प्रभुलकर, रूपाली भोसले, अभिषेक देशमुख, गौरी कुलकर्णी आणि अपूर्वा गोरे हे कलाकार होते. मालिकेंमध्ये, मिलिंद गवळीने अनिरुद्धची भूमिका, मधुराणी प्रभुलकरने अरुंधतीची भूमिका, रूपाली भोसलेने संजनाची भूमिका निभावली आहे. तर अभिषेक देशमुखने यशची भूमिका, अपूर्वा गोरेने ईशाच्या भूमिका तर गौरी कुलकर्णीने गौरीची भूमिका साकारली आहे.
gauri kulkarni shares heartfelt note journey of aai kuthe kay karte serial