बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या अफवांमुळे चर्चेत होती. मात्र, 'सिंघम अगेन'च्या प्रमोशनदरम्यान अर्जुन कपूरने सांगितले होते की, त्याचे ब्रेकअप झाले आहे आणि तो आता सिंगल आहे. अर्जुन आणि मलायका यांच्यातील नात्याची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. 5 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांचे ब्रेकअप झाले. मात्र, आता अभिनेत्री तिच्या भूतकाळातून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. मलायकाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर नवीनतम फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री परदेशात सुट्टी घालवताना दिसत आहे.
मलायका अरोरा घेतेय परदेशात सुट्टीचा आनंद! (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
या फोटोमध्ये मलायका अरोराने स्टायलिश ओव्हरकोट परिधान केलेला दिसत आहे आणि या कोटमध्ये ती तिचे लांबलचक पाय फ्लाँट करत आहे. या फोटोमध्ये मलायका खुर्चीवर बसून पोज देत आहे.
या फोटोमध्ये मलायका अरोरा खिडकीबाहेरचे दृश्य पाहताना दिसत आहे. फोटोमध्ये मलायका पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तसेच तिने केसांमध्ये मॅचिंग क्लिप लावला आहे.
या फोटोमध्ये मलायका क्युट स्टाईलमध्ये सेल्फी घेत आहे. अभिनेत्रीचे हे व्हेकेशन फोटोज लोकांना खूप आवडत आहेत. चाहते या फोटोना भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहेत.
या फोटोमध्ये मलायका अरोरा समुद्रात बोट चालवताना दिसत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री क्युट स्टाईलमध्ये पोज देत आहे. जी चाहत्यांना खूप आवडली आहे.
या फोटोमध्ये मलायका अरोराचा डॅशिंग लुक दिसत आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीने सनग्लास्सेस घातले आहे ज्यामध्ये ती खूपच आकर्षित दिसत आहे.