Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आर्यन्स सन्मान २०२४’ पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न; ‘या’ चित्रपट आणि नाटकांनी मारली बाजी…

'वारसा परंपरेचा... अभिमान संस्कृतीचा!' या घोषवाक्यासह मनोरंजन विश्वातील मान्यवरांच्या कर्तृत्वाला सलाम आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करणारा 'आर्यन्स सन्मान पुरस्कार सोहळा' संपन्न झाला.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 27, 2025 | 05:15 PM
'आर्यन्स सन्मान २०२४' पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न; 'या' चित्रपट आणि नाटकांनी मारली बाजी...

'आर्यन्स सन्मान २०२४' पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न; 'या' चित्रपट आणि नाटकांनी मारली बाजी...

Follow Us
Close
Follow Us:

‘वारसा परंपरेचा… अभिमान संस्कृतीचा!’ या घोषवाक्यासह मनोरंजन विश्वातील मान्यवरांच्या कर्तृत्वाला सलाम आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करणारा ‘आर्यन्स सन्मान पुरस्कार सोहळा’ संपन्न झाला. पुणे येथील स्वारगेटमधील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य-दिव्य दिमाखदार सोहळ्यात विजेत्यांना ‘आर्यन्स सन्मान २०२४’ प्रदान करण्यात आले. या सोहळ्याला मराठी मनोरंजन विश्वातील मकरंद अनासपुरे, सुनील बर्वे, निर्मिती सावंत, सयाजी शिंदे, संदीप पाठक, आनंद इंगळे, सावनी रविंद्र, शैलेश दातार, अशोक समर्थ, पूजा पवार, उमा सरदेशमुख, मिलिंद फाटक, जगन्नाथ निवंगुणे, मिलिंद शिंतरे, अंशुमन विचारे, सुवेधा देसाई, हेमंत पाटील, प्रसाद वनारसे, निपुण धर्माधिकारी, देवेंद्र पेम, राहुल रानडे, निर्मात्या अमृता राव, सुरेश देशमाने, दीपक देवराज (महाराष्ट्र आर्थिक गुन्हे विभाग आयुक्त) आदी दिग्गज मंडळी उपस्थित होती. मुख्य चित्रपट, व्यावसायिक नाटक आणि प्रायोगिक नाटकाला १ लाख रुपये, तर तंत्रज्ञांसह इतर २५ हजार रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कारांची एकूण रक्कम १३ लाख रुपये ओमा फाऊंडेशनकडून वितरित करण्यात आली.

‘बलोच’ फेम तेजश्री जाधव आणि रोहन सिंग अडकले विवाहबंधनात, सप्तपदीचे Photo पाहिलेत का ?

या सोहळ्यात आर्यन ग्रुप ऑफ कंपनीजचे सीईओ मा. मनोहर जगताप यांनी मनोरंजन विश्वाशी निगडीत असलेल्या तीन घोषणा केल्या. ६ फेब्रुवारीपासून शहाण्या लोकांनी बनवलेला ‘इडियट बॅाक्स’ हे मनोरंजनपर अॅप सुरू करण्यात येणार आहे. चित्रपटसृष्टीतील कलाकार-तंत्रज्ञांना आर्यन्स ग्रुपच्या कोल्हापूर आणि पुणे येथे सुरू होणाऱ्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात येतील. याखेरीज यंदा साहित्यिकांसाठी आर्यन्स सन्मान पुरस्कार आयोजित करण्यात येणार आहे. यंदा पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रेक्षकांमधून लकी-ड्रॉ द्वारे निवडण्यात आलेल्या पाच भाग्यवान प्रेक्षकांना ३० ऑगस्ट २०२५ रोजी सिंगापूरमध्ये संपन्न होणाऱ्या तिसऱ्या आर्यन्स सन्मान पुरस्कारासाठी नेण्यात येणार आहे.

 

या सोहळ्यात चित्रपट विभागात ‘एक दोन तीन चार’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटावर आपले नाव कोरले. ‘श्यामची आई’ चित्रपटासाठी गौरी देशपांडेने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा, तर ‘एक दोन तीन चार’साठी निपुण धर्माधिकारीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आपल्या नावे केला. याखेरीज लक्षवेधी अभिनेता संदीप पाठक (श्यामची आई), लक्षवेधी अभिनेत्री नम्रता संभेराव (नाच गं घुमा), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री नीता शेंडे (बापल्योक), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता प्रियदर्शन जाधव (शक्तिमान), सर्वोत्कृष्ट बालकलाकार शर्व गाडगीळ (श्यामची आई), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक वरुण नार्वेकर (एक दोन तीन चार), सर्वोत्कृष्ट संवाद विवेक बेळे (अलीबाबा आणि चाळीशीतले चोर), सर्वोत्कृष्ट पटकथा वरुण नार्वेकर-निपुण धर्माधिकारी, सर्वोत्कृष्ट कथा विवेक बेळे (अलीबाबा आणि चाळीशीतले चोर), सर्वोत्कृष्ट गायिका रुचा बोंद्रे (श्यामची आई), सर्वोत्कृष्ट गायक दिव्य कुमार (नवरदेव बीएससी. अॅग्री.), सर्वोत्कृष्ट गीतकार गुरू ठाकूर (बापल्योक), सर्वोत्कृष्ट संगीत आदित्य बेडेकर (शक्तिमान), सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर (शक्तिमान), सर्वोत्कृष्ट छायाचित्रण गौरव पोंक्षे (शक्तिमान), सर्वोत्कृष्ट संकलन सचिन नाटेकर (स ला ते स ला ना ते), सर्वोत्कृष्ट ध्वनीमुद्रण पियुष शहा (अलीबाबा आणि चाळीशीतले चोर), सर्वोत्कृष्ट वेशभूषा नामदेव वाघमारे (श्यामची आई), सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन योगेश इंगळे (अल्याड पल्याड), सर्वोत्कृष्ट रंगभूषा सौरभ कापडे (स्वरगंधर्व सुधीर फडके) यांनी पुरस्कार पटकावले. सर्वोत्कृष्ट चित्रपट – समीक्षक हा पुरस्कार ‘तेरवं’ आणि स ला ते स ला ना ते या दोन चित्रपटांना देण्यात आला.

प्रेमाच्या अलवार भावनेची हळूवार झलक! ‘इलू इलू’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज…

व्यावसायिक नाट्य विभागामध्ये ‘आज्जी बाई जोरात’ या नाटकाने सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार आपल्या नावे केला. ‘नकळत सारे घडले’ या नाटकातील भूमिकेसाठी आनंद इंगळे यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर ‘आज्जी बाई जोरात’मधील निर्मिती सावंत यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यासपीठावरूनच निर्मितीताईंनी हा पुरस्कार आपल्या नाटकातील हरहुन्नरी अभिनेता अभिनय बेर्डेसोबत शेअर करत असल्याचे सांगितले. यासोबतच त्यांनी मनोहर जगताप यांनी केलेल्या घोषणांचे कौतुक केले. यासोबतच सर्वोत्कृष्ट लेखक क्षितीज पटवर्धन (आज्जी बाई जोरात), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन (आज्जी बाई जोरात), सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार मयूरेश पेम (ऑल दि बेस्ट), लक्षवेधी अभिनेता दिलीप प्रभावळकर आणि विजय केंकरे (पत्रा पत्री), सर्वोत्कृष्ट नेपथ्य संदेश बेंद्रे (चाणक्य), सर्वोत्कृष्ट संगीत सौरभ भालेराव आणि क्षितीज पटवर्धन (आज्जी बाई जोरात), सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना प्रदीप मुळ्ये (आज्जी बाई जोरात), सर्वोत्कृष्ट वेशभूषा नीरजा पटवर्धन (चाणक्य), सर्वोत्कृष्ट रंगभूषा कमलेश बीचे (चाणक्य) यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रायोगिक नाट्य विभागामध्ये ‘घंटा घंटा घंटा घंटा घंटा’ या नाटकाने सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार आपल्या नावे केला. ‘घंटा घंटा घंटा घंटा घंटा’ या नाटकातील भूमिकेसाठी ललित प्रभाकरला सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर ‘घंटा घंटा घंटा घंटा घंटा’मधील मल्लिका सिंग हंसपाल, ‘तुजी औकात काये?’मधील भूमिकेसाठी प्रतिक्षा खासनीस आणि निकिता ठुबे यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. यासोबतच सर्वोत्कृष्ट प्रायोगिक लेखक दत्ता पाटील (कलगीतुरा), सर्वोत्कृष्ट प्रायोगिक दिग्दर्शक मोहित टाकळकर (घंटा घंटा घंटा घंटा घंटा) यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राज ठाकरेंच्या भेटीनंतर लक्ष्मण उतेकरांनी घेतला महत्वाचा निर्णय, ‘छावा’तील तो सीन डिलीट करणार!

राष्ट्रीय पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपट समीक्षक, अभ्यासक, संशोधक, लेखक-दिग्दर्शक अशोक राणे आणि प्रायोगिक नाट्य चळवळीची पुरस्कर्ती संस्था असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे यांना आर्यन्स सन्मान विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. हे दोन्ही पुरस्कार आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज चेअरमन मा. मुकुंदजी जगताप, आर्यन ग्रुप ऑफ कंपनीजच्या एमडी स्मिता शितोळे-जगताप, ओमा फाऊंडेशनचे अध्यक्ष मा. अजय जगताप आणि अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

पुरस्कार सोहळ्यात सादर केलेल्या गीत-नृत्याद्वारे भालजी पेंढारकरांपासून सचिन पिळगांवकरांपर्यंतच्या सुवर्णकाळाला मानवंदना देण्यात आली. यात वैदेही परशुरामी, मृण्मयी देशपांडे, मीरा जोशी, पुष्कर जोग, अंकित मोहन, प्रथमेश परब, गिरीजा प्रभू, समृद्धी केळकर, श्वेता खरात, जुई बेंडखळे, अस्मिता चिंचाळकर या कलाकारांनी जुन्या गाजलेल्या गाण्यांवर नृत्य सादर करत रसिकांची दाद मिळवली. अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि डॅा. श्वेता पेंडसे यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. रेड कार्पेट वर आरजे बंड्या ने उपस्थित कलाकार आणि पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधला. श्रीनिवास भणगे, हेमंत देवधर, राहुल रानडे, सौमित्र पोटे, अभिजित अब्दे यांनी सिनेपरीक्षक, तर अजित भुरे, रवींद्र पाथरे, राजू जोशी, महेंद्र सुके, प्रदीप वैद्य यांनी नाट्यपरीक्षक म्हणून काम पाहिले. राज काजी या सोहळ्याचे जुरी समन्वयक होते.

Web Title: Marathi film industry aaryans sanman 2024 award ceremony was held ek don teen chaar movie aajjibai jorat drama and ghanta ghanta ghanta ghanta ghanta prayogik natak award win

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2025 | 05:15 PM

Topics:  

  • marathi film
  • Marathi Film Industry

संबंधित बातम्या

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO
1

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO

‘लास्ट स्टॉप खांदा…’ चित्रपटाचे कलरफुल पोस्टर लाँच, श्रमेश बेटकरसोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्री
2

‘लास्ट स्टॉप खांदा…’ चित्रपटाचे कलरफुल पोस्टर लाँच, श्रमेश बेटकरसोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्री

‘बिन लग्नाची गोष्ट’ मधील पाहिलं गाणं रिलीज, प्रिया बापट आणि भारती आचरेकरचा लाभला आवाज
3

‘बिन लग्नाची गोष्ट’ मधील पाहिलं गाणं रिलीज, प्रिया बापट आणि भारती आचरेकरचा लाभला आवाज

Bal Karve: ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4

Bal Karve: ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.