सुकन्या- संजय मोनेंच्या लेकीने ऑस्ट्रेलियात मिळवली मास्टर्स पदवी; नोकरी करून पूर्ण केलं शिक्षण, होतोय कौतुकाचा वर्षाव
मराठमोळी अभिनेत्री सुकन्या मोने हिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मराठी मालिका, नाटक आणि चित्रपट या तिनही माध्यमांतून सुकन्या मोने यांनी आपल्या चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या सुकन्या मोने सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांची लेक ज्युलिया मोने हिने नुकतंच परदेशात आपलं मास्टर्सचं शिक्षण पूर्ण केलं आहे. ज्युलिया मास्टर्सची डिग्री चांगल्या गुणांनी पास झालेली आहे. याबद्दलची माहिती अभिनेत्री सुकन्या मोने यांनी राजश्री मराठीसोबत बोलताना आपल्या चाहत्यांना सांगितले आहे.
सिकंदर का मुकद्दर अखेर ओटीटी रिलीज, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार!
अभिनेत्री सुकन्या मोने अनेकदा चित्रपट आणि मालिकेदरम्यान त्यांच्या प्रत्येक मुलाखतीत लेकीबद्दल भरभरून बोलत असतात. आता अशातच सुकन्या मोने यांनी आपल्या लेकीबद्दल पुन्हा एकदा भरभरून बोलले आहे. ज्युलियाने नुकतंच परदेशात आपलं मास्टर्सचं शिक्षण पूर्ण केलं आहे. ज्युलिया मास्टर्सची डिग्री चांगल्या गुणांनी पास झाल्याची माहिती सुकन्या यांनी सांगितली. सुकन्या मोने यांनी राजश्री मराठीशी संवाद साधताना आनंद व्यक्त केला आहे. वन्यप्राणी जीवशास्त्र (वाइल्डलाइफ बायोलॉजी) म्हणजेच ‘मास्टर इन अॅनिमल सायन्स अँड मेजर इन वाइल्डलाइफ बायोलॉजी’या विषयात ज्युलियाने मास्टर्स पूर्ण केलं आहे.
सुकन्या मोने यांनी ‘राजश्री मराठी’सोबत बोलताना झाले की, “घरापासून लांब राहून तिथे जॉब करून ज्युलियाने हे यश मिळवलं आहे. याचा मला प्रचंड आनंद आहे. हे संपूर्ण श्रेय तिचं आहे. आमचा फक्त तिला पाठिंबा होता. स्वत: जॉब करून तिने स्वत:चा खर्च उचलला आणि तिकडे स्कॉलरशिप सुद्धा मिळवली. मला या सगळ्याचं खूप कौतुक आहे. आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय याची तिला कायम जाणीव असते. ती ऑस्ट्रेलियात ‘मास्टर इन अॅनिमल सायन्स अँड मेजर इन वाइल्डलाइफ’ बायोलॉजीचं शिक्षण घेत होती. याबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हती. पण, या विषयात चांगली ग्रेड मिळवत ती उत्तीर्ण झाली आहे. याचा प्रचंड आनंद आहे. सगळं सार्थकी लागलं असं वाटतंय. पण तेवढीच तिची जबाबदारी वाढलीये कारण आता ती तिथेच जॉब करेल.”
दरम्यान, सुकन्या मोने यांची लेक ज्युलियाने केलेल्या अभिमानास्पद कामगिरीवर संपूर्ण कलाविश्वातून आणि सुकन्या यांच्या फॅन्सवर्गातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
दिपक कलालचा विमानात प्रवाश्यासोबत राडा, केली फ्लाईटमध्येच फुल ऑन हाणामारी; पाहा Video