Savaniee Ravindrra Photos
आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे सावनी रविंद्र. आपल्या सुमधूर आवाजाने सावनीने मराठी कलाविश्वात आपलं स्वत:चं वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे. कायमच आपल्या गाण्यासोबतच सावनी क्लासी लूकमुळेही चर्चेत असते.
सावनी अनेकदा आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवरही क्लासी आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. अशातच अभिनेत्रीच्या घरी सध्या लगीनघाई सुरु आहे. तिच्या दिराच्या लग्नाच्या निमित्ताने अभिनेत्रीने सुंदर लूक केला होता.
सावनी रवींद्रने सावनीने या खास प्रसंगी आकर्षक पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती, जी साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. तिच्या डौलदार नटण्यात साधेपणा आणि पारंपरिकतेचा सुंदर संगम पाहायला मिळाला. आकर्षक साडी, नाजूक दागिने, आणि तिच्या प्रसन्न हास्याने तिने सर्वांचे मन जिंकले.
दिराच्या लग्नाचा सोहळ्यातील फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सावनीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
आपल्या मधाळ आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या सावनीने गेल्या काही दिवसांपासूनच म्युझिक पॉडकास्ट शो सुरु केला आहे. हा शो संगीतविश्वातील पहिलाच 'मराठी म्युझिक पॉडकास्ट' आहे.