स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. मालिकेत नवा ट्विस्ट म्हणजे दहिहंडीच्या दिवशी नागराजने मधुभाऊंना चाकूने वार करुन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र अर्जुन आणि सायली यांना वेळीच कळल्यामुळे मधुभाऊंना लवकरात लवकर हॉस्पीटलमध्ये नेता आलं. मधुभाऊ शुद्धीत आले तर आपलं काही खरं नाही हे नागराज पुरतं ओळखूनआहे म्हणूनच मधुभाऊ शुद्धीत येणार नाही यासाठी नागराजचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचशिवाय प्रतिमाची स्मृती पुन्हा येऊ नये म्हणून नागराज तिला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर सायलीच्या आई वडिलांचं सत्य समोर येण्यासाठी अर्जुनचे प्रयत्न सुरु आहेत.
अर्जुन सायलीच्या आई वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे मात्र सुभेदारांच्या कुटुंबात दरी निर्माण होत असल्याचं दिसत आहे. एकीकडे सुभेदार कुटुंब आणि दुसरीकडे खोटी तन्वी म्हणजे प्रियाच्या प्रेमात आंधळा झालेला आश्विन आहे. सायली मात्र कायमच घर जोडून ठेवण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसत आहे. आजच्या भागात सुभेदारांकडे प्रतिमा येते आणि कल्पना म्हणजेच अर्जुनची आई आणि सायलीमधील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करते. यात प्रतीमाला अर्जुन आणि त्याचे वडिल देखील साथ देतात. सायली आणि कल्पना मधील वाद आता मिटतील का? अर्जुनला सायलीच्या आई वडिलांचं सत्य समणार का ? प्रियाच्या आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधलेल्या अश्विनला खरं केव्हा समजणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मधुभाऊ शुद्धीवर येणार का ? तसंच नागराजचं सत्य उघड झाल्यावर काय होईल, असे अनेक प्रश्व सध्या प्रेक्षकांच्या मनात सुरु आहेत. मालिका आता पुढे काय वळण घेणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.
स्टार प्रवाहच्या मालिकांचा सध्या महासंगम पाहायला मिळत आहे. या संकल्पनेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून वाहिनीवर मालिकांच्या टीआरपीमध्ये सकारात्मक परिणाम दिसत आहे. अशातच आता येत्या रविवारी ठरलं तर मग, घरोघरी मातीच्या चुली, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकांचे एक तासांचे विशेष भाग पाहायला मिळणार आहे.