
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा लेक 2 डिसेंबरला लग्नबंधनात अडकला. सोहम बांदेकरने अभिनेत्री पूजा बिरारीशी लग्नगाठ बांधली आहे.या दोघांच्या लग्नाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. अखेर येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या सेटवर घेतलेल्या उखाण्यात पूजाने सोहमचं नाव घेत प्रेमाची जाहीर कबुली दिल्याचे पाहायला मिळाले. पुजा आणि सोहमचा विवाह सोहळा मोठ्याल थाटात लोणावळ्यात पार पडला. या लग्नसोहळ्यासाठी मनोरंजन सृष्टीतले अनेक कलाकार उपस्थित होते. यानंतर मुंबईत बांदेकर कुटुंबीयांनी खास रिसेप्शनचं आयोजन देखील केलं होतं. या दोघांच्या रिसेप्शनला राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.
अभिनेत्रीने लग्नानंतर पुन्हा एकदा कामाला सुरूवात केली आहे. तिने नुकतीच लग्नानंतर पहिली मुलाखत राजक्षी मराठीला दिली. यावेळी तिला नव्या संसाराबद्दल आणि लग्नानंतर मुलीच्या आयुष्यात काय बदल होतात याबद्दल विचारण्यात आलं. यावर अभिनेत्री पूजा बिरारी म्हणाली, ” मला लग्नानंतर फार काही बदललंय असं वाटत नाहीये. कारण, मी लग्नाच्या आधीपासूनच मुंबईत एकटी राहत होते. उलट लग्नानंतर मला छान वाटतंय कारण मला आता आयुष्यभरासाठी हक्काचा रूममेट भेटलाय”
पुढे अभिनेत्री म्हणाली, “खरं सांगायचं झालं तर, लग्नानंतर माझ्या बाबतीत असे फार काही बदल झालेले नाहीत. मात्र, बिचाऱ्या सोहमच्या आयुष्यात बदल झाले आहेत. कारण, तो त्याचं घर सोडून इथे आला आहे. आम्ही दोघांनी आमच्या कामापासून जवळ पडेल असं घर पाहिलंय. तर, खऱ्या अर्थाने बदल सोहमसाठी झालाय.”
अखेर ‘छावा’ आणि ‘जवान’वर केली मात! ‘Dhurandhar’ बॉक्स ऑफिसवर सुस्साट, १००० कोटींच्या कमाईसाठी एवढाच दूर
सुचित्रा बांदेकर यांनी काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या मुलाला लग्नाबाबत महत्त्वाचा सल्ला दिला होता. त्यांनी सांगितले की, लग्न झाल्यानंतर मुलांनी वेगळं राहून स्वतःचा संसार उभा करावा. “तुम्हाला काही अडचण आली तर मी तुमच्यासोबत आहे. रोज घरी येऊन जेवायला या, त्याला काही हरकत नाही. पण त्यानंतर तुमचा संसार तुम्हीच सांभाळा,” असं त्या म्हणाल्या.त्यांनी पुढे सांगितले की, समोरच्या मुलीचंही माहेर असतं, तिचेही आई-वडील असतात. त्यामुळे सगळ्यांनी आनंदात आणि समजुतीने राहावं. “मी इतकी वर्षं माझं घर सांभाळलं, आता तुम्ही तुमचं घर छान सांभाळा,” असंही त्या म्हणाल्या.