
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘उत्तर’मधील ‘नन्या’ने जिंकली प्रेक्षकांची मने! अभिनय बेर्डेच्या अभिनयाचं सर्वत्र होतंय कौतुक
नेटफ्लिक्स वर येणाऱ्या आगामी “तस्करी” वेब सीरिज मध्ये अक्षया अनेक बॉलीवूड मधल्या बड्या स्टार्स सोबत दिसणार आहे. नुकताच तस्करीचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि यात ती एका सीन मध्ये इमरान हाश्मी सोबत दिसते आहे. पहिली वहिली वेब सीरिज आणि त्यात सुद्धा इमरान सारख्या कलाकारांसोबत सोबत काम करणं हा अक्षया साठी जॅकपॉट आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
तस्करी मधल्या अनुभवाबद्दल बोलताना अक्षया म्हणाली, “इमरान हाश्मी सरांसारख्या बॉलीवूडमधल्या मोठया स्टार सोबत आपण काम करतोय ही भावना खूप खास होती. आमच्या दोघांचे अगदीच 2/3 सीन होते पण ते करताना देखील थोड दडपण आलं आणि तेवढं छान सुद्धा वाटलं. पहिली वेब सीरिज आणि सहकलाकार म्हणून इमरान हाश्मी सरांसोबत काम करायला मिळणं ही माझ्यासाठी सुवर्ण संधी आहे असं मला वाटतं.” असे अभिनेत्री म्हणाली आहे.
प्रथमेश परब ‘गोट्या गँगस्टर’ चित्रपटामधून करणार कमबॅक; ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांचा वाढला उत्साह
फॅशन असो वा अभिनय ती कायम चर्चेत असलेली अभिनेत्री ठरली आहे आता येणाऱ्या काळात ती अजून नावीन्यपूर्ण प्रोजेक्ट्स आणि भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे समजले आहे. अभिनेत्री अक्षया नाईकने नुकतेच ओटीटी वरही पदार्पण केले आणि आता तिला बॉलीवूड चित्रपटामध्ये पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. तसेच ‘तस्करी’ हा चित्रपट देखील ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.