Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तांबड्या मातीतील अस्सल रांगडा खेळ दर्शवणारं बिग हिट मीडियाचे ‘पैलवान’ गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाण्याची चर्चा!

बिग हिट मीडिया प्रस्तुत ‘पैलवान’ गाण्याचा संगीत अनावरण सोहळा जल्लोषात संपन्न झाला आहे. या सोहळ्यात अभिनेता अंकित मोहन, अभिनेता भूषण शिवतारे, आणि बालकलाकार शंभूने हजेरी लावली होती.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 24, 2024 | 11:02 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या प्राचीन कुस्ती या खेळाचा उल्लेख अगदी रामायण, महाभारतात देखील आवर्जून केला जातो. कुस्ती हा शारीरिक ताकद, कौशल्य, धैर्य, बुद्धी आणि तांत्रिकतेचा एक उत्कृष्ट संगम आहे. भारतीय संस्कृती आणि इतिहासाचा एक अविभाज्य भाग असलेल्या या खेळाला भारतात सन्मानाचे स्थान आहे. कुस्तीच्या खेळातून भारतीय समाजात शौर्य, शिस्त, आणि निष्ठा यांचे मूल्य रुजवले गेले आहे. अश्याच आपल्या तांबड्या मातीतल्या खेळावर आधारीत बिग हिट मीडिया प्रस्तुत ‘पैलवान’ गाणे प्रदर्शित झाले आहे.

हे गाणं पाहून भारतीय कुस्तीचा सुवर्णकाळ अजूनही सुरू आहे आणि पुढील पिढ्या या खेळात नवीन यशाची शिखरे गाठतील याची खात्री पटते. हे गाणं भावनिक, रोमांचक, थरारक, प्रेरणादायी आहे. या गाण्यात अंकित मोहन सोबत भूषण शिवतारे, ८२ वर्षीय ज्येष्ठ हिंद केसरी दीनानाथ सिंग, शंभू आणि आयुष काळे झळकले आहेत. बालकलाकार शंभू याचे इन्स्टाग्रामवर २.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. हे गाणं सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी गायलं असून ब्रम्हा यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. तर या गाण्याची गीतरचना ब्रम्हा आणि भूषण विश्वनाथ यांनी केली आहे. या गण्याचं दिग्दर्शन मनीष महाजन याने केलं आहे. या गाण्याची निर्मिती हृतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट यांनी केली आहे. नुकताच या गाण्याचा संगीत अनावरण सोहळा पुण्यात थाटामाटात पार पडला आहे.

या गाण्याच्या संगीत अनावरण सोहळ्याला क्रीडाविश्वातील ज्ञानचंद पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू असलेले एम ओ वीचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री प्रदीप गंधे, एम ओ वीचे भारत तायक्वांदो-अध्यक्ष श्री.नामदेव शिरगावकर, ज्ञानचंद पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू/रेफरी आणि एम ओ वीचे – रोइंग यांची हजेरी लागली असून, हिंदी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये गेल्या अनेक दशकापासून कार्यरत असलेले अनिल मनी आणि माननीय मुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे खाजगी सचिव अविनाश सोलवट तसेच कलाकार विशाल फाळे, अनुश्री माने, विश्वास पाटिल, दिग्दर्शक अभिजीत दानी हे उपस्थित होते.

 

फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड अश्या मराठमोळ्या सिनेमांमध्ये आपल्या कलेने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता अंकित मोहन पैलवान गाण्याविषयी म्हणाला की, “मला असं वाटतं माझ्या नशिबातचं पैलवानाची भूमिका करणं होतं. मी बिग हिट मीडियाचे आभार मानतो. की त्यांनी मला पैलवान गाण्यात काम करण्याची संधी दिली. सेटवर सर्व कुस्तीपटूंसोबत शूट करताना एक सकारात्मक ऊर्जा मिळाली.” पुढे तो शूटींगचा एक किस्सा सांगताना म्हणाला, “गाण्याचं शूट ५ दिवस पुण्यात होतं. रेड अलर्ट असतानाही आम्ही तिथे शूट केलं. निसर्गाचा चमत्कार म्हणजे आम्ही इन डोअर शूट करताना पाऊस पडत होता. आणि आऊट डोअर शूट करताना २ दिवस सलग ऊन होतं. मला वाटतं देवाच्या मनात हे गाणं संपूर्ण शूट व्हावं असं होतं. सोशल मीडियावर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहता हे गाणं लोकांच्या मनावर अधिराज्य करेल हे निश्चित आहे.” असे त्याने सांगितले.

हे देखील वाचा – मुलींपासून चार हात लांब राहणाऱ्या तरुणाची “मनमौजी” गोष्ट, चित्रपटाचे धमाकेदार ट्रेलर रिलीज!

शिवरायांचा छावा, रांगडा, सुभेदार अश्या सिनेमांमधील अभिनेता भूषण शिवतारे गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगतो, “तांबड्या मातीतला अस्सल रांगडा खेळ मी लहानपणापासून खेळतो. मी स्वत: पैलवान आहे. आपल्या तांबड्या मातीतले रांगडे पैलवान कसे आहेत हे या गाण्यामार्फत दर्शवले आहे. बिग हिट मीडिया टीमने मला या गाण्याविषयी विचारलं तेव्हा मला अत्यंत आनंद झाला. मी ज्या खेळात पारंगत आहे तीच कुस्तीवीराची भूमिका माझ्या वाट्याला आली. यातच मला समाधान आहे.” असे तो म्हणाला.

Web Title: Big hit media released the song pailwaan the song was heavily discussed on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 11:02 AM

Topics:  

  • marathi entertainment

संबंधित बातम्या

स्वराज्याचा हुंकार मोठ्या पडद्यावर! ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ प्रेक्षकांच्या भेटीस
1

स्वराज्याचा हुंकार मोठ्या पडद्यावर! ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ प्रेक्षकांच्या भेटीस

गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला दिली मोठी धडक; पुण्यामधून अपघाताचे PHOTOS व्हायरल
2

गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला दिली मोठी धडक; पुण्यामधून अपघाताचे PHOTOS व्हायरल

‘लास्ट स्टॉप खांदा…’ चित्रपटाचे कलरफुल पोस्टर लाँच, श्रमेश बेटकरसोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्री
3

‘लास्ट स्टॉप खांदा…’ चित्रपटाचे कलरफुल पोस्टर लाँच, श्रमेश बेटकरसोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्री

‘.. आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे शंभरावा चित्रपट’, अभिनय कारकिर्दीत प्रसाद ओकची शंभरी; म्हणाला…
4

‘.. आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे शंभरावा चित्रपट’, अभिनय कारकिर्दीत प्रसाद ओकची शंभरी; म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.