फोटो सौजन्य - JIO Cinema सोशल मीडिया
‘बिग बॉस’चे हे सिझन सुरु झाल्यापासूनच अरबाजने चाहत्यांच्या मनात घर केला आहे. अरबाज आठव्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर आला आहे. तसेच या सिझनमध्ये अरबाज आणि निक्कीची जोडी चांगलीच जमली आहे आणि चाहत्यांना ती आवडली सुद्धा आहे. या दोघांची मैत्री पाहून चाहत्यांना खूप आनंद होत आहे. परंतु, रितेश देशमुखसह घरातील अन्य सदस्यांनी अनेकदा अरबाजला ‘निक्कीमुळे तुझा खेळ दिसत नाहीये’ असे देखील सांगितले आहे. मात्र, तरीही हे दोघे घरात एकत्र खेळताना दिसले आहेत. आणि कितीही दोघांमध्ये भांडण झाले तरीही ते दोघे पुन्हा एकत्र दिसले आहेत.
‘बिग बॉस मराठी ५’ प्रसिद्ध रिऍलिटी शोमध्ये या आठवड्यात घरातील प्रत्येक सदस्यांचे कुटुंब त्यांना ‘फॅमिली वीक सस्पेशल’ मध्ये भेटायला येत आहेत. कुटुंबाला पाहून सगळलेच सदस्य भावुक होताना दिसले आहेत. याचदरम्यान कलर्स वाहिनीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंवर नुकताच एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये निक्कीची आई बिग बॉसच्या घरात प्रवेश करते. आणि तिच्या आईने निक्कीला अरबाजच्या बाहेरील जगातील नात्यांचा खुलासा केला आहे. आता नक्की म्हणतात निक्कीची आई जाणून घेऊयात.
कलर्सने शेअर केला बिग बॉसचा नवीन प्रोमो
अरबाज रविवारी एलिमिनेट झाला तेव्हा निक्की ढसाढसा रडली. अरबाजही भावुक झाला होता. बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर निक्कीसाठी मनात भावना असल्याची अरबाजने सांगितले आहे. घराबाहेर आल्यावर तो चाहत्यांना निक्कीसाठी वोट करा असंही म्हणताना दिसला आहे. याचदरम्यान आता ‘बिग बॉस’ने एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये निक्कीजवळ तिची आई प्रमिला तांबोळी येतात आणि म्हणतात, “अरबाज चुकीचा चाललाय, त्याने असं नव्हतं करायला पाहिजे, त्याची इंगेजमेंट झाली आहे.” यावर निक्की म्हणते, “कोणाची”? मग प्रमिला म्हणाल्या, “अरबाजची.” यानंतर निक्कीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. ती निराश होते.
हे देखील वाचा- रमेश सिप्पी, अमिताभ-धर्मेंद्र कसे करायचे शोलेचं शूटिंग? सचिन पिळगावकर यांनी सांगितलं किस्सा
लगेच निक्की भडकते आणि म्हणते, “आता मी सांगते बिग बॉस, जर तो आला तर मी मेंटली पागल होईन. अरबाज निक्की जे होतं ना, ते सगळं संपलंय.” यानंतर निक्की अरबाजचे कपडे आणि इतर साहित्य गोळा करते आणि कॅमेऱ्यात बिग बॉसला म्हणते की हे अरबाजचे कपडे आहेत, तुम्ही ते फेकून द्या. निक्कीच्या आईने तिला जे सांगितलं ते ऐकून निक्कीचा संताप होतो. अरबाज बिग बॉसच्या घराबाहेर आहे. निक्की आणि अरबाज यांची जोडी शो संपल्यानंतर पाहायला मिळेल, अशी शक्यता होती. पण आता मात्र वेगळंच दृश्य समोर आले आहे. या एपिसोडनंतर अरबाज प्रतिक्रिया देणार का, हे पाहणे चाहत्यांसाठी उत्कंठाचे ठरले आहे.